नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिवाळ्यात तब्येत सुंदर होण्यासाठी अनेकजण पौष्टिक आहाराचा उपयोग करतात विशिष्ट शाकाहारी व्यक्ती मेथीचे लाडू किंवा उडीद दाळीचे लाडू खातात. तर मांसाहारी व्यक्ती आपल्या आहारात नाश्त्यामध्ये अंडी आणि अंडयापासून बनविलेले पदार्थ खातात. तसेच आरोग्य संपन्न राहण्यासाठी व शरीराला फायदे मिळवण्यासाठी आहारतज्ज्ञ रोज उकडलेले अंडे खाण्याचा सल्ला देतात. उकडलेले अंडे खाण्याचे फायदे आज आपण आरोग्य टीप्समध्ये जाणून घेणार आहोत…
नाश्त्यासाठी अंडी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. विशेषतः उकडलेले खूप पौष्टिक मानले जाते. रोजच्या आहारात अंड्यांचा समावेश केल्याने आपल्याला संपूर्ण पोषण मिळते. तसेच अंड्यांसोबत दूध प्यायल्यास आरोग्याला होणारे फायदे आणखी वाढतात. अंड्यातील पिवळ बलक मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात आढळते. रोज खाल्ल्याने शरीरातील झिंकची कमतरताही दूर होते.
उकडलेले अंडे प्रथिने समृध्द असतात, वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात, ते खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, त्यामुळे अन्य फराळ खाण्याची इच्छा होत नाही. यामुळे वजन नियंत्रणात राहते. दुसरीकडे उकडलेले अंडे भाज्यांसोबत खाल्ले तर तुमचे वजनही कमी होते. उकडलेले अंडे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होत असेल तर रोज एक उकडलेले अंडे खावे. व्हिटॅमिन डी मिळाल्याने मुलांचे दात, हाडे आणि त्यांची वाढ वाढण्यास मदत होते.
मेटाबॉलिज्मला चालना मिळते, शरीर सक्रिय ठेवण्यासाठी प्रथिनांची गरज असते. उकडलेले अंडे खाल्ल्याने लोकांना कार्बोहायड्रेट किंवा चरबी खाण्यापेक्षा जास्त कॅलरी बर्न करण्यास मदत होते. यामुळे मेटाबॉलिज्मला चालना मिळते. त्वचा, केस आणि नखांसाठी फायदेशीर असतात. तसेच उकडलेले अंडे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन ही पोषक तत्वे असतात. उकडलेले अंडे खाल्ल्यानेही मोतीबिंदूचा धोका कमी होतो. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात आणि केस मजबूत होतात.
अंडी स्नायूंना बळकट करते, कोलीन हे एक पोषक तत्व आहे जे मेंदू, मज्जासंस्था आणि हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. हे मेंदूच्या पेशींच्या पडद्याची रचना राखण्यास मदत करते. गरोदर महिलांना ते खाल्ल्याने खूप फायदा होतो.