पेठ – पेठ नगरपंचायत मध्ये गेल्या पंचवार्षिक मध्ये शिवसेनेची एकहाती होती. पण, राष्ट्रवादीने कॉंग्रेसने या निवडणुकीत सर्वाधिक आठ जागा मिळवत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. पेठ नगरपंचायत मध्ये होणारी पंचवार्षिक निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला लागू न पडल्याने स्थानिक पातळी वरील नेत्यांनी सुरुवाती पासून स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे शिवसेना , राष्ट्रवादी , कॉंग्रेस (आय) माकप या पक्षांनी कमी अधिक उमेदवार देऊन एकमेकांना आव्हान दिले होते. तर भाजपाने १५ प्रभागात उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपसभापती झिरवाळ यांचे सुपुत्र गोकूळ झिरवाळ यांच्या मार्गदर्शना खाली अध्यक्ष दामू राऊत व गिरीष गावीत यांच्या नेतृत्वाखाली आठ जागांवर विजय मिळवित सत्ता स्थापनेत कडे वाटचाल केली आहे. शिवसेनेचे जिप सदस्य तथा तालुका प्रमुख भास्कर गावीत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने चार जांगावर तर माकपाने ३ जांगावर विजय मिळविला तर अपक्ष व भाजप यांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला आहे
पेठ नगर पंचायत निकाल
1 ) रामदास गायकवाड (राष्ट्रवादी)
2)मनोज घोंगे ( शिवसेना)
3)प्रकाश धुळे ( शिवसेना )
4 ) युवराज लिमले (राष्ट्रवादी )
5 ) लता सातपुते (शिवसेना )
6 )छाया हलकंदर ( राष्ट्रवादी )
7 ) विजय पंडित धूम ( राष्ट्रवादी )
8 ) गणेश गावित ( अपक्ष )
9 )रामेश्वरी वहवारे ( राष्ट्रवादी )
10 ) अफरोजा शेख ( माकप )
11 )लता गायकवाड ( भाजप )
12 ) सरिता हाडळ ( राष्ट्रवादी )
13 )हेमलता वळवी ( माकप )
14 ) राहुल चोथावे ( माकप )
15 ) करण करवंदे ( राष्ट्रवादी )
16 ) अलका कस्तुरे ( राष्ट्रवादी )
17 ) शीतल राहणे ( शिवसेना )
एकूण जागा 17
राष्ट्रवादी 8
शिवसेना 4
माकपा 3
भाजपा 1
अपक्ष 1