मुंबई – राज्यात येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.