मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे यांना आज आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरेंच्या हातून आता शिवसेना पक्षाचे विधीमंडळ कार्यालयही गेले आहे. शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या नेतृत्वात इतर आमदारांसह विधानभवनात पोहोचले. आणि त्यांनी विधान भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला आहे. यासंदर्भात शिंदे गटाच्या आमदारांकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची लवकरच भेट घेतली जाण्याची शक्यता आहे. भरत गोगावले म्हणाले की, आम्ही सभापतींना नोटीस दिली आहे. आम्ही निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करत आहोत. पुढे कसे जायचे याचा विचार करू. आयोगाने आम्हाला शिवसेना म्हणून मान्यता दिल्याने हे कार्यालय आता आमचे आहे, असे गोगावले म्हणाले.
भारतीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी निकाल देताना शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला देण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर राजकारण तापले आहे. गेल्या वर्षी शिंदे यांनी ठाकरेंविरोधात बंड केल्यापासून शिवसेनेचे दोन्ही गट (एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे) पक्षाच्या धनुष्यबाणाच्या निवडणूक चिन्हासाठी लढत आहेत. शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. कोणतीही निवडणूक न घेता आपल्या मर्जीतील व्यक्तींना हुकुमशाही पद्धतीने नियुक्त दिल्याचे आणि ही पक्ष रचना सर्वांमध्ये विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरत असल्याचे आयोगाने निकालात म्हटले आहे.
ठाकरेंच्या अडचणीत वाऋ
शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. राज्यातील सत्ता गेली. ते मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाले. त्यानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही गेले आहे. आता शिवसेना भवन, उर्वरीत आमदार, खासदार व पदाधिकारी यांच्यावरही टांगती तलवार आहे.
शिवसेना विधीमंडळ कार्यालयाचा शिंदेगटाने ताबा घेतला
शिवसेना पक्षचे नाव मिळाल्यावर विधी मंडळातील कार्यालय शिंदे गटाकडे #शिवसेना pic.twitter.com/E5YALF0snM
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) February 20, 2023
Uddhav Thackeray Shivsena Party Assembly Office Shinde Group