इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एक शतकाहून अधिक काळाची परंपरा असलेल्या बुगाटी कारचा उल्लेख झाला की अब्जाधीशच डोळ्यापुढे येणार. कारण या कंपनीची सर्वांत स्वस्त कार भारतात जवळपास २२ कोटी रुपयांना उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यावेळी या कंपनीने पेट्रोल कार बंद करण्याची घोषणा केली तेव्हा शेवटच्या पेट्रोल कारची बोली लागली. आणि लिलावात ती कार तब्बल ७८ कोटी रुपयांत गेली.
बुगाटीची शेवटची पेट्रोल कार जेवढ्या किमतीत विकली गेली तेवढे पैसे भारतातील एक मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर राबूनही कमावू शकत नाही, अशी स्थिती आहे. पण बुगाटीचा शौक फक्त जगभरातील अब्जाधीशच पाळू शकतात, असे म्हणतात ते उगाच नाही. भारतातील वाढत्या प्रदूषणामुळे भारतातील जवळपास सर्वच ऑटोमोबाईल कंपन्या आयसीई इंजिनच्या कारची निर्मिती बंद करीत आहेत.
बुगाटी कंपनीनेही हा निर्णय घेतला आणि लगेच जाहीरही केला. त्यामुळे जगभरातील अब्जाधिशांनी मोठ्या प्रमाणात कारची खरेदी केली. पण शेवटची कार शिल्लक आहे, असे बुगाटी कंपनीने जाहीर केले आणि लिलावात बोली लावण्यासाठी सारेच तुटून पडले. त्यामुळे या कारच्या रितसर लिलावात श्रीमंतांनी बोली लावली आणि शेवटी ७८ कोटी रुपयांना म्हणजे साडेनऊ दशलक्ष डॉलरला ही कार विकली गेली. कंपनीची तर साडेदहा दशलक्ष डॉलरची कमाई झाली आहे.
विक्रम रचला
एखादी कार लिलावात सर्वाधिक किमतीत विकली जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. त्यानुसार बुगाटी चिरॉन कंपपीने जगातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. लिलावात एवढी महागडी कार म्हणून आजपर्यंत कधीच नोंद झालेली नाही.
सर्वांत वेगवान मॉडेल
बुगाटी चिरॉनचे हे सर्वांत वेगवान मॉडेल असल्याचे सांगितले जात आहे. ही कार २.३ सेकंदांत शुन्य ते १०० किलोमीटर प्रती तासाचा वेग पकडू शकते. आणि २०० किमोटर प्रतीतासाचा वेग पकडण्यासाठी या कारला अवघे साडेपाच सेकंद लागतात. चिरॉन ताशी ३७८ किलोमीटर वेगाने धावू शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे.
Bugatti Car Auction Record 78 Crore Sold
Automobile