इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चंद्र हा आकशातील सर्वांत देखणा ग्रह. या चंद्राच्या रुपावर कित्येक गाणी झाली. कित्येक गितकारांनी प्रेयसीची तुलना प्रेयसीसोबत केली आहे. तर याच चंद्रावर जाण्याचं आकर्षण प्रत्येक अंतराळप्रेमीला राहिलेले आहे. मात्र आपल्याला दिसतो त्याव्यतिरिक्तही अनेक छोट्या आकाराचे चंद्र अंतराळात भ्रमंती करत आहेत. आणि आता तर त्यात आणखी भर पडल्याची माहिती पुढे आली आहे.
चंद्राची अनेक छोटी रुपं आहेत. त्यापैकी ८३ चंद्र शनीभोवती फिरतात. तर गुरुभोवती ८० चंद्र फिरतात. पण आता ज्या १२ नव्या चंद्रांचा शोध लागला आहे ते सारे गुरूभवती फिरतात. त्यामुळे गुरुभवती फिरणाऱ्या चंद्रांची संख्या आता ९२ झाली आहे. परिणामी चंद्रांना आपल्या अवतीभवती फिरवण्यात गुरूने शनीला मागे टाकले आहे. मुख्य म्हणजे या चंद्रांचा आकार किती आहे, याचा शोध घेण्यासाठी बरेच दिवस संशोधन चालले. या संशोधनात नवे १२ चंद्र अर्धा किलोमीटर ते तीन किलोमीटर आकाराचे असल्याचा निष्कर्ष लावण्यात आला आहे. अंतराळाचे अभ्यासक कुठलेही नवे ग्रह आढळले की त्यांना नावे देतात. या चंद्रांना अद्याप नावे देण्यात आलेली नसली तरीही नावे द्यावी, एवढा मोठा त्यांचा आकार नक्कीच आहे, असेही संशोधकांनी म्हटले आहे.
नासा करणार अभ्यास
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनीस्ट्रेशन अर्थात नासा पुढील वर्षी गुरूच्या चंद्रांचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी नासा खास मोहीम राबविणार असून त्याला युरोपा क्लिपर असे नाव देणार आहे. त्यामुळे येत्या काळात प्रत्येक चंद्राचं वैशिष्ट्य आणि त्याचं मूळ आपल्याला नासाच्या माध्यमातून कळणार आहे.
असा लागला शोध
गेल्या दोन वर्षांमध्ये हवाई आणि चिलीमधील दुर्बिणींच्या सहाय्याने प्रदीर्घ काळ निरीक्षण करण्यात आलं. या निरीक्षणात नव्या चंद्रांचा शोध लागलेला आहे. मोठे चंद्र एकमेकांवर, धुमकेतूंवर किंवा छोट्या ग्रहांवर आदळल्याने त्यातून लहान चंद्र तयार झाले असावेत, असे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले आहे. मात्र लवकरच गुरू आणि शनीच्या चंद्रांमध्ये आणखी वाढलेली दिसेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Nasa Astronomy Moon Figures Increase Saturn Jupiter