नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिक परिसरातील तलावडी भागात जुगार खेळणा-या चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जुने नाशिक परिसरातील तलावडी भागात पोलिसांनी ही कारवाई केली. पत्यांच्या कॅटवर तीन पत्ती जुगार खेळत होते. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत खैरनार (रा.दत्तचौक,सिडको), ख्वाजा हुसेन शेख (रा.सोमवार बाजार,ना.रोड), मोसिन सादिक पठाण (रा.पंचशिलनगर,गंजमाळ) व सुभाष मुर्तडक (रा.मोरेमळा हनुमानवाडी) अशी संशयित जुगारींची नावे आहेत. तलावडीतील नसिम हॉस्पिटलच्या बाजूला काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.५) भद्रकाली पोलिसांनी धाव घेत छापा टाकला असता संशयित पोलिसांच्या जाळयात अडकले. ते पत्यांच्या कॅटवर तीन पत्ती जुगार खेळत होते. या कारवाईत ४ हजार ५४० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून अंमलदार नितीन भामरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक काठे करीत आहेत.
……….