नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर येथे महिलेचे दागिणे पळविणा-या चोरट्यास पोलिसांनी गजाआड केले आहे. नितीन विष्णू जाधव (३१ रा.बेने ता.त्र्यंबकेश्वर) असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रमिकनगर येथील मौले सिटी भागात त्याने उघड्या घरात शिरून स्टीलच्या डब्यात ठेवलेले सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले होते. याप्रकरणी संगिता भाऊराव तुपलोंढे (रा.तुपलोंढे निवास,मौले सिटी जवळ) यांनी तक्रार दाखल केल्याने सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील सिसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून भामट्याचा माग काढत त्यास बेड्या ठोकल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.