नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरातील पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाचे वृत्त आहे. पंचवटी विभागात आर. पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ भरणारी उर्ध्ववाहिनी आहे. पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रामधील आवारात क्रॉस कनेक्शन काम करण्यासाठी सोमवारी (२३ जानेवारी) या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सोमवार २३ जानेवारी रोजी हे काम केले जाणार आहे. तसे महापालिकेने कळविले आहे.
या भागात पाणी नाही
आर. पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ यावरुन प्र.क्र.४, ५ व ६ मधील जुने पंचवटी गावठाण परिसर, सेवाकूंज, गजानन चौक, गुरूद्वारा रोड, ढिकले नगर, सरदार चौक, नाग चौक,, सिता गुंफा रोड, काळाराम मंदिर परिसर ते शनिचौक, सुकेनकर लेन, पंचवटी राजवाडा, आर.पी टाकी परिसर, वाल्मीकनगर, संजय नगर, वाघाडी लगतचा परिसर, गजानन कॉलनी, वाघ मळा, जगझाप मार्ग व मखमलाबाद रोडवरिल लगतचा परिसर, मधुबन कॉलनी, जाधव कॉलनी, नवनिर्माण चौक, उदय कॉलनी, कृष्णगनर, ड्रीमकॅसल परिसर, जाणता राजा कॉलनी काही परिसर, क्रांतीनगर, शिंदे मळा, वृंदावन नगर, प्रोफेसर कॉलनी, नागरे मळा, मोरे मळा, हनुमान वाडी, चौधरी मळा, तुळजा भवानी नगर इत्यादी परिसरातील सोमवार २३ जानेवारी रोजीचा संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही व मंगळवार २४ जानेवारी रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याबाबत परिसरातील नगरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभाग वितरणचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.