नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागातून चोरट्यांनी चार दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गंगापूर,सरकारवाडा,उपनगर व नाशिकरोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली घटना नाशिक पुणे मार्गावरील टिव्हीएस शोरूम भागात घडली. धिरज विनोद तिजारे (रा.ढिकलेनगर,पंचक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तिजारे दांम्पत्य गेल्या शुक्रवारी (दि.२३) टिव्हीएस शोरूम भागातील चायनिज हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. हॉटेल बाहेर लावलेली त्यांची एमएच ३० बीएन २६८३ मोपेड दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक बोडके करीत आहेत.
दुसरी घटना नाशिकरोड भागात घडली आहे. राजेंद्र रंगनाथ वाघले (रा.पवारवाडी पंचक) हे गेल्या मंगळवारी (दि.२०) नाशिकरोड भागात गेले होते. दुर्गा गार्डन परिसरातील स्टेट बँक शाखेच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांनी आपली एमएच १५ पी ७७४४ दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.तिसरी घटना सावरकरनगर भागात घडली आहे. हनुमानवाडी कॉर्नर भागात राहणारा सनी नानासाहेब भडांगे (रा.विठ्ठल अपा.) हा युवक शनिवारी (दि.१४) सायंकाळी सावरकरनगर येथील ग्रॅव्हीटी जीम येथे व्यायामासाठी गेला होता. जीमच्या पार्किंगमध्ये लावलेली त्याची एमएच १५ जीएन ११९८ मोपेड चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
चौथी घटना जिल्हारूग्णालय आवारात घडली. अनिकेत राजू वाघमारे (रा.नवीन स्टेशनवाडी,देवळाली कॅम्प) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वाघमारे गेल्या शनिवारी (दि.१७) मित्रास भेटण्यासाठी जिल्हा रूग्णालयात गेले होते. आवारात पार्क केलेली त्यांच्यी स्प्लेंडर एमएच १५ वायजी ९८७८ चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक साबळे करीत आहेत.