इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांना ICICI बँक कर्ज प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. तपास यंत्रणेशी संबंधित लोकांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणी तपास यंत्रणेने आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना यापूर्वीच अटक केली आहे. ते सध्या तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीत आहेत.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 71 वर्षीय धूत यांना सोमवारी मुंबईतून अटक करण्यात आली. आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला अटक केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांची अटक झाली आहे. CBI ने ICICI बँकेच्या माजी सीईओ आणि MD चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 2019 मध्ये नोंदवलेल्या बँक कर्ज प्रकरणात आरोपी म्हणून नाव दिले आहे. त्यांच्याशिवाय दीपक कोचर संचालित न्यूपॉवर रिन्यूएबल्स (NRL), सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. आयसीआयसीआय बँकेने बँकिंग नियमन कायदा, आरबीआय मार्गदर्शक तत्त्वे आणि बँकेच्या पत धोरणाचे उल्लंघन करून वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुप ऑफ कंपन्यांना 3,250 कोटी रुपयांच्या कर्ज सुविधा दिल्याचा सीबीआयचा आरोप आहे.
CBI arrests Videocon founder Venugopal Dhoot in connection with ICICI Bank loan case: Officials
— Press Trust of India (@PTI_News) December 26, 2022
Videocon Chairman Venugopal Dhoot Arrested by CBI
ICICI Bank Loan Fraud Case