इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल १४३८ जागांसाठी भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी या पदासाठी असलेल्या या भरतीसाठी येत्या १० जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
संकलन सूत्रधारची ९४० तर सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी ही ४९८ पदे भरली जाणार आहेत. मुंबईमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत. ६५ वर्षापर्यंत वयोमर्यादा असलेल्यांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. स्टेट बँकेच्या sbi.co.in या वेबसाईटवर अर्ज करावेत, असे बँकेने स्पष्ट केले आहे. या पदांसाठी उमेदवारांना २५ ते ४० हजार रुपयांपर्यंतचा पगार मिळणार आहे. अर्जांचे शॉर्टलिस्टिंग केले जाईल. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीला १०० गुण राहणार आहेत.
State Bank of India recruitment