इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
प्रयत्न हाच उपाय
ईश्वरेच्छा आणि इतरांची इच्छा याविषयी मनात आदर, आपुलकी व प्रेमभाव असल्याशिवाय स्वतःची इच्छा दूर ठेवून दुसऱ्याची इच्छा मान्य करणे जमणार नाही. ते आनंद देणारेही ठरणार नाही.
जोपर्यंत स्व-केंद्रित विचारांचे काहूर मनात चालू आहे तोपर्यंत अंतःकरणातून येणारे ईश्वरी संदेश वा आदेश कसे कानी पडतील? परमेश्वराचे मार्गदर्शन तर पावलोपावली असतेच. पण ते ऐकू येण्यापुरतीही नीरवता आपण आपल्या मनी क्वचितच नादू देतो. पावलागणिक उठणारा मनातील गोंगाट थांबविण्याकरिता क्षणोक्षणी प्रयत्न केल्याशिवाय हे साधणार नाही. प्रयत्न हाच उपाय.