इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – श्रद्धा वालकर आणि आफताबचे प्रकरण देशभरात चांगलेच गाजते आहे. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या श्रद्धाला आफताबने ठार मारले. एवढेच नव्हे तर, त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते ठिकठिकाणी फेकून दिले. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रद्धा आणि आफताबचे हे प्रकरण संपूर्ण देशभर गाजत आहे. लिव्ह इनमध्ये श्रद्धा आफताबसोबत राहत होती. मात्र, आफताबने श्रद्धाचा खून केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाॅलीवूड क्षेत्रातील अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या घटनेचा निषेध नोंदवला. आता या घटनेनंतर अशाच प्रकारच्या अनेक घटना समोर येऊ पाहतायत. एका टीव्ही अभिनेत्रीने आपल्या लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. इतकेच नाही तर आपण स्वत: अशा मारहाणीतून गेल्याचे तिने सांगितले आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘दिया और बाती’ फेम कनिष्का सोनी.
कनिष्का सोनीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने आपण अशा मानसिकेतून गेल्याचं म्हटलं आहे. कनिष्क म्हणते, मी श्रद्धाची व्यथा समजू शकते. माझा स्वतःचा अनुभवही काहीसा असाच आहे. मला एका अभिनेत्याने लग्नासाठी विचारले होते. जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा मी त्याचा राग आणि सहन केला आहे. मला वाटायचं की लग्नानंतर तो सुधारेल. तो मला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सांगत होता. परंतु यासाठी माझ्या घरून विरोध होता. शिवाय मला स्वतःला देखील ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे नव्हते, असे कनिष्का सांगते.
‘लिव्ह इन’मध्ये असताना आपला पार्टनर आपल्याला कसे मारत होता आणि लग्नाचा विषय काढल्यावर पुढे काय करायचा या सर्वांचा व्हिडीओ कनिष्काने सोशल मीडियावर शेअर केला आहे. कनिष्काचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ती किती त्रासातून गेली आहे, हे आपल्या लक्षात येईल. माझा जोडीदार देखील आफ्ताबसारखाच असल्याचे कनिष्का सांगते. मी त्याच्यासोबत रहात होते, तेव्हाचे दिवस माझ्यासाठी खूप कठीण असल्याचे तिने सांगितले.
कनिष्का म्हणते, ‘श्रद्धाच्या स्टोरीशी मी स्वतःला जोडू शकते. मला आठवते की एका अभिनेत्याने मला प्रपोज केले होते आणि लग्न करण्याचे वचन देखील दिले होते. त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना मी त्याचा राग, हिंसक स्वभाव हे सारं बघितलं आहे. पण लग्न झाल्यानंतर सगळं सुरळीत होईल, असं मला वाट होत. म्हणूनच एका रात्री मी लग्नाविषयी त्याला विचारणा केली पण त्यावर त्याने मला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. शेवटी घाबरून मी माझे काही साहित्य घेऊन तिथून पळून आले. प्रेमामध्ये मुलांचे हे रूप मी नेहमी पहिले आहे.
मला नाही वाटत आपल्या देशातील मुली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये त्या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहता यावे यासाठीच जातात. मी सर्व मुलींना हेच सांगेन की, जरी देशातील परिस्थिती बदलली असली तरी जोपर्यंत तुम्ही त्या मुलाला पूर्णपणे ओळखत नाही, तोपर्यंत हा निर्णय घेऊ नका. ‘अशा वाईट मानसिकतेच्या व्यक्तीशी लग्न करण्यापेक्षा मुलींनी एकटे राहून आपले आयुष्य जगलेले केव्हाही चांगले.
Actress Kanishka Soni on Live in Relationship