इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
अशाच गोष्टी तू मला दे
ज्या कशाने मी तुझ्याकडे नेणाऱ्या मार्गावर आरूढ होईन अशाच गोष्टी तू मला दे. ज्यायोगे मनःशांती लाभेल, अशाच गोष्टी माझ्या हातून घडू देत.
तुझ्या हृदयीच अखेरीस मला विश्रांती मिळणार असल्याने कष्टप्रद कर्मे करीत असता तुझे सतत स्मरण मला राहील असे कर. तुझ्यावाचून सर्व कांही नि:सत्त्व आणि भारभूत आहे असे मला वाटू दे.