मालेगाव ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सटाणा रोडवरील अँक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरु असतांना गस्तीवर असलेल्या कँम्प पोलिस या ठिकाणी पोहचताच चोरट्यांनी पळ काढला. पोलिसांना या चोरीची माहिती मिळताच त्यांनी सायरन वाजवले. त्यानंतर चोरट्यांना पोलिस येत असल्याचे लक्षात येताच पळ काढला. पोलिसांनी एटीएम मध्ये जाताच चोरी करण्यासाठी आणलेले साहित्य गँस कटर, पक्कड, गोण्या व गॅस सिलेंडर आढळून आले वेळीच पोलिस घटनास्थळी पोहचल्याने चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न त्यामुळे फसला. पोलिसांनी सर्व साहित्य ताब्यात घेतले.