नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुर्ला – शालिग्राम एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आग लागली. ही रेल्वे मुंबईहून बिहारकडे जात असतांना ही घटना घडली. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर ही गाडी आल्यानंतर पार्सल बोगीतून धूर येत असल्याचे आरपीएफच्या जवानांच्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या पथकाला बोलवण्यात आले. त्यामुळे ही आग आटोक्यात आली. प्रवासी गाडी असलेल्या या एक्सप्रेसच्या पार्सल बोगीत आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील आरपीएफ जवानाच्या समय सूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला.