देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळा – नाशिक रस्त्यावर हॉटेल बाडमेर जवळ एसटी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील दोन जण गंभीर जखमी झाले तर बस मधील काही प्रवासी जखमी झाले आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकहून ही बस साक्रीकडे जात होती. तर कार कार नाशिकच्या दिशेने जात होती. दोन्ही गंभीर जखमींना देवळा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बस मधील प्रवाशांना मात्र किरकोळ इजा झाली आहे. समोरा समोर झालेल्या या अपघातात मात्र कारचे मोठ नुकसान झाले आहे.