मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड कडून मालेगावच्या दिशेने सिमला मिर्चीचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक मालेगाव जवळ काही अंतरावर सोमवारी सकाळी पलटी झाला. या अपघातामुळे संपूर्ण रस्त्यावर मिरचीचे बॉक्स पडल्याने मोठ नुकसान झाले. या अपघातात ड्रायव्हर जखमी झाला असून त्याला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने वाहतूकीवर मात्र फारसा परिणाम झाला नाही. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले.