India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सप्तश्रृंगगडावर तृतीयपंथींचा मेळावा संपन्न; विविध भागातील तृतीयपंथाची उपस्थिती (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
October 10, 2022
in स्थानिक बातम्या
0

सप्तश्रृंगगड – श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगडावर कोजागिरी पौर्णिमेला तृतीयपंथींचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी सप्तशृंगगडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल झाले होते. यात मुंबई, पुणे, कल्याण, नाशिकसह, गुजरात व मध्य प्रदेशातील तृतीयपंथींचाही समावेश होता. तृतीयपंथींकडून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीचा छबिना म्हणजे मिरवणूक काढण्यात आली. यानंतर रात्री त्यांचा मेळावा भरला. यात त्यांच्या गुरूला शिष्याकडून भेट देण्याची पंरपरा आहे. शिष्याला दीक्षा देण्याचाही कार्यक्रम झाले. रात्रभर जागर करून देवीच्या गीतांचे गायन करण्यात आले. तसेच ठिकठिकाणच्या कार्यक्रमात जाऊन तृतीयपंथींनीही नृत्य केले. पौर्णिमेला तृतीयपंथीयांची मोठ्या प्रमाणावर गडावर उपस्थिती असते. सवाद्य मिरवणुकीत सुवर्णालंकार परिधान करून तृतीयपंथी सहभागी होतात. पौर्णिमेला सायंकाळी अभिषेक प्रारंभाची प्रतिवर्षीची परंपरा आहे. रात्री १२ वाजता अभिषेक पूर्णाहुती व कोजागरीची सांगता असे नियोजन असते. कावडधारकांना प्रवेशासाठी स्वतंत्र मार्ग असतो. यामार्गावर आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन आखण्यात आले आहे. तसेच पोलिस प्रशासन, महसूल, विविध शासकीय विभाग व विश्वस्त संस्था कर्मचाऱ्यांच्या सतर्क बंदोबस्तात तृतीयपंथी यांची छबिना व कावडधारकांची मिरवणूक काढण्यात आली.
https://youtu.be/izNt6Oo3tkk


Previous Post

मुल्हेर येथील रास क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न (बघा व्हिडिओ)

Next Post

मालेगावजवळ सिमला मिर्चीचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक पलटी (व्हिडिओ)

Next Post

मालेगावजवळ सिमला मिर्चीचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक पलटी (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

बँकेचा चेक देताना चार वेळा विचार करा! बाऊन्स झाला तर आता होणार ही कठोर कारवाई

January 28, 2023

गर्लफ्रेंडने तुडवले, कंपनीनेही दूर लोटले! ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कची जगभरात जोरदार चर्चा

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group