नाशिक : इंद्रकुंड भागात अॅटोरिक्षात ठेवलेले लोखंडी चॅनल पळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास नागरीकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. गौतम रंभाजी साबळे (४२ रा.इगतपुरी चाळ,मोठा राजवाडा वडाळानाका) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सचिन सुभाष दुसाणे (रा.जेजूरकरमळा,औरंगाबाद रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. दुसाणे शुक्रवारी (दि.१२) इंदकुंड भागात गेले होते. रस्त्यावर आपली एमएच १५ एके ५४८४ अॅटो रिक्षा पार्क करून ते अल्पावधीच्या कामासाठी शेजारी गेले असता संशयित रिक्षातील सुमारे पाच हजार रूपये किमतीचे लोखंडी चॅनल चोरतांना मिळून आला. नागरीकांनी संशयितास पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले असून,अधिक तपास पोलिस नाईक झनकर करीत आहेत.