अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहरात असलेल्या पाणी पुरवठा केंद्रात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षकाच्या एका शिपायाला मारहाण झाल्याची घटना घडली. पाणी पुरवठा क्षेत्र परिसरात राहणा-या एका व्यक्तीनेच मारहाण केल्याने या सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला मार लागला आहे. या पाणी पुरवठा केंद्रात कर्मचा-यांचे १२ निवासस्थान आहे. मात्र त्यात काही कुटुंब विनापरवानगी राहत असल्याच बोलले जात आहे. हे कर्मचारी सफाईचे काम करत असतात. त्यांना तेथे राहण्याची परवानगी नसतांना अवैधरित्या ते तेथे वास्तव्यास आहे. या परिसरात बाहेरील कुठल्याही वाहनांना परवानगी नाही, केवळ कामा निमित्त येणा-या गाड्याच या ठिकाणी येऊ शकतात. सायंकाळच्या सुमारस एका सफाई कर्मचा-याचा भाऊ रिक्षातून आला असता त्याने गेट उघडण्यासाठी सुरक्षा रक्षकाला सांगितले. मात्र त्याने त्यास मनाई केल्याने झालेल्या वादात सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याने त्यात तो जखमी झाला.