India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

९१ किलो सोने… ३४० किलो चांदी…. ७६१ लॉकर्स… ईडीला सापडले मोठेच घबाड

India Darpan by India Darpan
September 14, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी एका फर्मच्या गुप्त लॉकरमधून तब्बल ४७ कोटी ७६ लाख रुपयांचे सोने आणि चांदी जप्त केले आहे. मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सच्या चार ठिकाणांवर ईडीने छापा टाकला. शोध मोहिमेनंतर ईडीने एकत्रितपणे ९१.५ किलो सोने आणि ३४० किलो चांदी जप्त केली आहे. त्याची अंदाजे किंमत ४७ कोटी ७६ रुपये एवढी असल्याचे सांगितले जात आहे.

अल्युमिनियम फॉइल कंटेनर आणि स्टोरेज अॅल्युमिनियम कंटेनर तयार करण्यात गुंतलेली मुंबईस्थित कंपनी मेसर्स पारेख अॅल्युमिनियम लिमिटेड विरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला सुरू आहे. या संदर्भात एजन्सीने इतर कंपन्यांचाही शोध घेतला. ईडीने ८ मार्च २०१८ रोजी मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेड विरुद्ध पीएमएलए, २००२ च्या तरतुदींनुसार मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. बुधवारी जारी केलेल्या निवेदनात ईडीने म्हटले आहे की, “कंपनीने बँकांची फसवणूक केली आणि त्यांच्याकडून २,२९६.५८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर विविध कंपन्यांच्या माध्यमातून लेअरिंग करून पैशांची अफरातफर करण्यात आली. असुरक्षित कर्ज आणि गुंतवणूक देण्याच्या संदर्भात, पैसे विविध खात्यांमध्ये वळवले गेले. परंतु हा कर्ज घेण्याचा उद्देश नव्हता आणि अशा व्यवहारांसाठी कोणताही करार नव्हता.”

मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात खाजगी लॉकर्सच्या चाव्या सापडल्या. ईडीने सांगितले की, “खासगी लॉकर्सची झडती घेतली असता असे आढळून आले की लॉकर्स योग्य नियमांचे पालन न करता चालवले जात आहेत. कोणतेही केवायसी पाळले गेले नाही आणि आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले नाहीत.”

ईडीने निवेदनात म्हटले आहे की, “कोणतेही ‘इन आणि आउट’ रजिस्टर नव्हते. लॉकर परिसराची झडती घेतल्यावर असे आढळले की तेथे ७६१ लॉकर्स आहेत, त्यापैकी ३ मेसर्स रक्षा बुलियनचे आहेत. लॉकर्स उघडल्यावर, २ लॉकरमध्ये ९१.५ किलो सोने आणि १५२ किलो चांदी आढळून आली आणि जप्त करण्यात आली. मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारातून अतिरिक्त १८८ किलो चांदीही जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ४७.७६ कोटी रुपये आहे.” अँटी मनी लाँडरिंग एजन्सीने यापूर्वी २५ जून २०१९ रोजी ४६.९७ कोटी रुपये आणि ११ सप्टेंबर २०१९ रोजी १५८.२६ कोटी रुपये तात्पुरत्या स्वरुपात जप्त केले होते.

ED concluded searches on 4 premises belonging to M/s Raksha Bullion & M/s Classic Marbles. The searches were conducted in connection with the money laundering probe in case of M/s Parekh Aluminex ltd. Seizure of 91.5 kg gold and 340 kg silver, valued at ₹ 47.76 Cr. has been made pic.twitter.com/xF1ga42rs2

— ED (@dir_ed) September 14, 2022

91 KG Gold 340 KG Silver 761 Locker ED Raid
Searches 4 premises M/s Raksha Bullion & M/s Classic Marbles Money Laundering
M/s Parekh Aluminex ltd


Previous Post

अडचणीतील सूतगिरण्यांबाबत मंत्रालयातील बैठकीत झाला हा निर्णय

Next Post

शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर

Next Post

शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर

ताज्या बातम्या

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरती; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे स्पष्टीकरण

September 29, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group