रविवार, जून 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या दोन महिन्यात होणार तब्बल ९ लाख वाहनांची खरेदी; सरकारचा मोठा निर्णय

by India Darpan
फेब्रुवारी 4, 2023 | 5:28 am
in राष्ट्रीय
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र आणि राज्य सरकारे, परिवहन महामंडळे आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंधरा वर्षांपेक्षा जुनी ९ लाख सरकारी वाहने येत्या १ एप्रिलपासून रस्त्यावरून हटवली जातील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यामुळे या दोन महिन्यात सरकारकडून तब्बल ९ लाख वाहनांची खरेदी केली जाणार आहे.

जुन्या वाहनांची जागा नवी वाहने घेतली जातील. सरकार इथेनॉल, मिथेनॉल, बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुलभ करण्यासाठी अनेक पावले उचलत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. एफआयसीसीआयतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रदूषणात भर घालणाऱ्या बसेस आणि कार रस्त्यावरून हटवण्यात येणार आहेत आणि त्यांच्या जागी पर्यायी इंधनासह नवीन वाहने आणली जातील. दरम्यान, हा नियम देशाच्या संरक्षण मोहिमेत, कायदा आणि सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षेसाठी वापरल्या जाणार्‍या विशेष उद्देशाच्या वाहनांवर लागू होणार नाही. रजिस्टर्ड वाहन स्क्रॅप युनिटद्वारे ही वाहने स्क्रॅपमध्ये काढली जातील.

प्रदूषणाला आळा, अर्थव्यवस्थेला चालना
गेल्या वर्षीच नितीन गडकरी यांनी 150 किमीच्या आत किमान एक ऑटोमोबाईल स्क्रॅपिंग सुविधा विकसित करण्यास इच्छुक आसल्याचे सांगितले होते. संपूर्ण दक्षिण आशियाई क्षेत्राचे वाहन स्क्रॅपिंग हब बनण्याची क्षमता देशात आहे, असा दावाही नितीन गडकरी यांनी केला होता. 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय वाहन स्क्रॅपेज धोरण सुरू केले होते. यामुळे नादुरुस्त आणि प्रदूषण करणारी वाहने हटवण्यास मदत होणार असून यामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.

कार्बन उत्सर्जन टाळण्यावर भर
नितीन गडकरी म्हणाले की, जर देशाने वाहतुकीसाठी धोरणात्मक आणि पद्धतशीर दृष्टिकोन अवलंबला तर 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याचे भारताचे उद्दिष्ट बर्‍याच प्रमाणात साध्य करणे शक्य आहे. परिवहन क्षेत्राचे डिकार्बोनाइजेशन करण्याची नितांत गरज आहे, यावर त्यांनी भर दिला. सर्व जागतिक दर्जाच्या सुविधांसह अधिकाधिक बसेस इलेक्ट्रिक मोडवर असणे ही काळाची गरज आहे. कारण यामुळे अधिकाधिक लोक सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित होतील आणि खाजगी वाहनांच्या वापरापासून परावृत्त होतील.

9 Lakh Vehicles Scrap from April Purchasing
Old Vehicles

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गायी, शेळ्या, मेंढ्यांमुळे होते प्रदूषण; कसं काय? बघा, हे संशोधन काय सांगते..

Next Post

सरकारने सुरू केलेले महाराजस्व अभियान काय आहे? त्याचा सर्वसामान्यांना काय फायदा होणार आहे? घ्या जाणून सविस्तर..

Next Post
mantralya mudra

सरकारने सुरू केलेले महाराजस्व अभियान काय आहे? त्याचा सर्वसामान्यांना काय फायदा होणार आहे? घ्या जाणून सविस्तर..

ताज्या बातम्या

nilesh rane

नितेशने जपून बोलावे, मी भेटल्यावर बोलेननच…निलेश राणेंचा भावाला सल्ला

जून 8, 2025
election11

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालांच्या संदर्भात केलेले दावे….निवडणूक आयोगाने दिली ही प्रतिक्रिया

जून 8, 2025
Untitled 22

कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

जून 8, 2025
Untitled 21

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार…ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

जून 8, 2025
jail11

घरफोडीत करुन स्कोडा कार मधून फिरणा-या त्रिकुटाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

जून 8, 2025
dam12

गोदावरी नदीच्या पात्रात ६ मुले बुडाली…रात्री उशीरापर्यंत शोधमोहीम

जून 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011