इंडिया दर्ण ऑनलाईन डेस्क – पती पत्नीचे नाते हे प्रेमाचे, विश्वासचे आणि जिव्हाळ्याचे असते, तसे ते शारीरिक संबंधाचेही असते, त्यामुळे यात वावगे वाटण्याचे कारण नाही, परंतु या संबंधालाही काही मर्यादा असतात. विशिष्ट काळानंतर पती-पत्नीमध्ये एकमेकांविषयी प्रेम, जिव्हाळा तसेच सुख दुःख वाटून घेण्याचे भावना आणि आपुलकी अधिक प्रमाणात वाटू लागते. कारण शारीरिकदृष्टया ते दोघेही थकलेले असतात. मात्र गुजरातमध्ये एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण वडोदरा ते सयाजीगंज परिसरातील आहे.
गुजरातमध्ये महिलांच्या हक्कांसाठी १८१ अभयम ही हेल्पलाइन चालविली जाते. या हेल्पलाईनवर पीडित महिला त्यांच्या तक्रारी नोंदवतात. एका तक्रारीमुळे अभयमच्या कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वडोदरा येथील रहिवासी असलेल्या ८७ वर्षीय महिलेने तक्रार केली की, तिला ८९ वर्षीय पतीच्या अतिलैंगिकतेमुळे त्रास होत आहे. तिचा नवरा तिच्याकडे वारंवार शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करतो.
तक्रार मिळाल्यानंतर अभयम टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि पतीला योगा करण्याचा सल्ला दिला. टीम अभयमने वृद्ध पतीला योगा करण्याचा आणि सेक्सोलॉजिस्टकडून उपचार करून घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या पतीने वारंवार सेक्सची मागणी केल्याने ती त्रस्त आहे. त्यामुळे त्यांचे जगणे कठीण झाले आहे. टीम अभयमच्या म्हणण्यानुसार ही बाब अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबातील आहे.
महिलेने टीम अभयमला फोन करून आपण ८७ वर्षांचे असल्याचे सांगितले तेव्हा संपूर्ण टीमला धक्काच बसला. एक एक करून महिलेने तिच्या पतीबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या. पतीच्या या कृत्यापासून तिला सुटका हवी आहे, असे महिलेने सांगितले. ज्या व्यक्तीविरुद्ध त्याच्या वृद्ध पत्नीने तक्रार दाखल केली आहे तो व्यवसायाने इंजिनिअर आहे. पती पत्नीकडे सतत शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करत होता. या दोघांमध्ये नेहमीच चांगले संबंध असल्याचेही समोर आले आहे. तो मुलगा आणि सुनेसोबत राहत होता.
वृध्द महिलेने सांगितले की, जेव्हा ती तिच्या पतीसोबत सेक्स करण्यास नकार देते तेव्हा तो खूप आक्रमक होतो आणि गोंधळ निर्माण करतो. नवरा ओरडतो, ओरडतो आणि शिव्या देतो. सदर महिला गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. आजारी असतानाही पत्नीकडे सेक्सची मागणी करताना आपली असमर्थता व्यक्त केल्याने ती नाराज झाली. त्यानंतर तिला हेल्पलाइन नंबर डायल करण्यास भाग पाडले. या तक्रारीनंतर अभयम टीमने घरी पोहोचून पतीचे समुपदेशन केले.
दुसऱ्या गोष्टींकडे मन वळवण्याचा सल्ला त्यांना दिला. योगा करण्याचा, वरिष्ठ नागरिकांच्या क्लबमध्ये सहभागी होण्याचा सल्लाही अधिकाऱ्यांनी त्यांना दिला. तसेच सेक्सॉलॉजिस्टकडे जाऊन त्यांच्यावर योग्य उपचार करा, अशी सूचना अभयमच्या पथकानं कुटुंबाला केली. मात्र या घटनेचे आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
89 Year Old Husband Demand Sex to 87 Year Old Wife
Crime Women Molestation Gujrat Abhayam Helipline