शुक्रवार, नोव्हेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वय ८ महिने… वजन साडेचार किलो… चिमुकल्यावर गुंतागुंतीची ‘ओपन हार्ट सर्जरी’… उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच शस्रक्रिया

ऑक्टोबर 8, 2022 | 6:42 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाव आरुष. वय ८ महिने. वजन अवघे ४ किलो ४०० ग्रॅम. या चिमुकल्याला जन्मजात हृदयविकार असल्याचे निदर्शनास आले. एवढ्याशा जीवाला हृदयविकार समजताच कुटुंबियांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. यानंतर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये या चिमुकल्याला दाखल करण्यात आले. वय, वजन कमी असताना गुंतागुंतीची शस्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान येथील डॉक्टरांवर होते. हे आव्हान पेलत या चिमुकल्यावर नुकतीच यशस्वी शस्रक्रिया झाली असून त्यास रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे….

एवढ्या कमी वयात केलेली आव्हानात्मक अशी ही पहिलीच ‘ओपन हार्ट सर्जरी’उत्तर महाराष्ट्रात झाल्याचे येथील हृदयविकार तज्ञ डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांनी सांगितले. अधिक माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील आणि वाडा तालुक्यातील नमन येथील आरुष वाघ या बालकास श्वास घेण्यास त्रास होणे, कपाळावर घाम येणे, स्तनपानाला प्रतिसाद न देणे, वजन न वाढणे, वारंवार श्वसनमार्गाचा संसर्ग होणे, न्यूमोनिया अशा तक्रारी होत्या.

एसएमबीटी हॉस्पिटलकडून सातत्याने ठाणे, पालघरसह नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. अशाच एका आरोग्य शिबिरात या बालकाची तपासणी करण्यात आली होती. याप्रसंगी त्यास हृदयविकार असल्याचे निदर्शनास आले. या बालकाच्या हृदयाला मोठे छिद्र होते. तसेच्या त्याच्या फुप्फुसातील दाबदेखील वाढलेला होता. यामुळे या चिमुकल्यावर शस्रक्रिया करणे अतिशय अवघड आणि तितकेच आव्हानात्मक असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. संपूर्ण शस्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असल्याने तितकीच काळजी याप्रसंगी घ्यावी लागणार होती. एसएमबीटी हॉस्पिटलच्या हृदयरोग तज्ञांनी हे आव्हान स्विकारले.

यानंतर या बालकावर हृदय उपचार करण्यात आले. हृदयउपचार झाल्यानंतर पुढील काही दिवस या बालकाची विशेष काळजी घेण्यात आली. पाच दिवस या बालकाची रात्रंदिवस अतिदक्षता (आयसीयू) विभागात काळजी घेऊन त्यास नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देताना चिमुकल्याच्या नातलगांनी रुग्णालय व डॉक्टरांचे आभार मानले. यावेळी बाळाचा नवा जन्म झाल्याची प्रतिक्रिया या बालकाच्या आई-वडिलांनी दिली.

मोफत उपचार
या चिमुकल्याच्या नातलगांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यांना एवढा मोठा खर्च करणे शक्य नव्हते. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ या चिमुकल्याला मिळाला असून त्यातून मोफत शस्रक्रिया झाली आहे. सध्या पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ होत आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष अशा स्वतंत्र कक्षाची स्थापना याठिकाणी करण्यात आली आहे. यासाठी १३ जणांची टीम कार्यरत असल्याने येथे येणाऱ्या प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन मिळते.

दोन महिन्यांत ८२ बालकांवर शस्त्रक्रिया
दर महिन्यातील शेवटच्या शनिवार आणि रविवार लहान मुलांच्या हृदयाच्या छिद्राचे (Device Clouser) मोफत उपचार केले जातात. या महिन्यातही वेगवेगळ्या ठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आले असून यात आढळून आल्या लहान मुलांवर या महिन्यातील दिनांक २९ व ३० ऑक्टोबर रोजी केले जाणार आहेत. गेल्या दोन महिन्यांत ८२ बालकांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

ऑपरेशन गुंतागुंतीचे होते. मोठा कालावधी लागणार होता. त्यात बालकाचे वय, वजन बघता मोठी रिस्क होती. परंतु, या बालकाच्या चेहऱ्यावर हसू उमटण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न पणाला लावले. शस्त्रक्रियेदरम्यान खूप कौशल्याने सर्व परिस्थिती हाताळली. या बालकाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. बालकाची परिस्थिती अतिशय चांगली असून हळूहळू त्याचे वजनदेखील वाढण्यास सुरुवात होईल.
– डॉ. विद्युतकुमार सिन्हा, एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट

8 Months Old Child Open Heart Surgery

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एकनाथ शिंदेंनी मेळाव्यात एवढी गर्दी कशी जमवली? खर्च कुणी केला? असा होणार उलगडा

Next Post

ग्राउंड रिपोर्ट- उन्हाळ कांदा चाळीतच सडला… हजारो टन कांदा उकिरड्यावर… शेतकरी हवालदिल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20221008 WA0029

ग्राउंड रिपोर्ट- उन्हाळ कांदा चाळीतच सडला... हजारो टन कांदा उकिरड्यावर... शेतकरी हवालदिल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011