इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सात सीटर चारचाकी गाड्यांमध्ये इकोने ग्राहकांची पहिली पसंती मिळवित बाजी मारली आहे. इकोने अर्टिगावर मात करत पहिला क्रमांक पटकाविला आहे. भारतात एसयूव्हींसह ७ सीटर कार्सनादेखील जोरदार मागणी आहे. गेल्या काही महिन्यांपासून मारुती सुझुकी अर्टिगा ही कार ७ सीटर कार्सच्या विक्रीच्या बाबतीत पहिल्या नंबरवर आहे. परंतु जानेवारी २०२३ मध्ये हे चित्र बदललं.
ही कार गेल्या वर्षभरात देशात सर्वाधिक विकली गेलेली ७ सीटर कार असली तरी जानेवारी महिन्यात एका स्वस्त ७ सीटर कारने अर्टिगावर मात केली आहे. तसेच विक्री घसरल्याने अर्टिगा ही कार देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० कार्सच्या यादीतून बाहेर पडली आहे. जानेवारी महिन्यात अर्टिगावर मारुतीच्याच दुसऱ्या कारने मात केली आहे. मारुती सुझुकी ईको ही देशातली सर्वाधिक विकली जाणारी ७ सीटर कार ठरली आहे.
कंपनीने गेल्या महिन्यात या कारच्या ११,७०९ युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कारच्या विक्रीत ११ टक्के वाढ झाली आहे. तर मारुतीने गेल्या महिन्यात अर्टिगा कारच्या ९,७५० युनिट्सची विक्री केली आहे. ही देशातली दुसरी सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. तर सर्व वाहनांच्या यादीत अर्टिगाचा १३ व्या नंबरवर आहे.
अशी आहे मारुती ईको
मारुती ईको ही कार कंपनी ५ सीटर आणि ७ सीटर अशा दोन पर्यायांमध्ये विकते. या कारमध्ये कंपनीने १.२ लीटर पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन ८१ पीएस पॉवर आणि १०४.४ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. ही कार सीएनजी व्हेरिएंटमध्ये देखील विकली जाते. ईकोचं सीएनजी मॉडेल ७२ पीएस पॉवर आणि ९५ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. ही कार पेट्रोलवर १९.७१ किमी प्रति लीटर तर सीएनजीवर २६.७८ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते.
7 Seater Maruti Ertiga Car Sale India Automobile