India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चीनमध्ये चाललंय काय? जॅक मा यांच्यानंतर आता दिग्गज उद्योगपती बाओ फॅन अचानक गायब

India Darpan by India Darpan
February 21, 2023
in राष्ट्रीय
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चिनी कंपनी रेनेसान्स होल्डिंग्स लिमिटेडचे ​​संस्थापक आणि दिग्गज उद्योगपती बाओ फॅन अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे हाँगकाँगमध्ये सूचीबद्ध त्यांच्या कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली आहे. चीनमध्ये उद्योगपती गायब होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

विविध आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सींनी म्हटले आहे की, चायना रेनेसान्स होल्डिंग्स लिमिटेडने हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या फाईलमध्ये म्हटले आहे की कंपनी बाओशी संपर्क करू शकत नाही. चायना रेनेसन्स होल्डिंग्ज लिमिटेडने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की बोर्डाकडे बाओ बेपत्ता झाल्याची कोणतीही माहिती नाही. कंपनीचा व्यवसाय पूर्वीप्रमाणेच सामान्य राहील. परदेशी मीडियाच्या वृत्तानुसार, जवळपास दोन दिवसांपासून बाओशी कोणताही संपर्क झालेला नाही.

कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण
चायना रेनेसान्स होल्डिंग्स लिमिटेड 2018 मध्ये हाँगकाँगमध्ये सूचीबद्ध झाली. बाओ गायब झाल्याच्या बातमीनंतर कंपनीचा स्टॉक 50 टक्के घसरला आणि सुमारे 5 हाँगकाँग डॉलर्सचा व्यापार करत होता, ज्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 480 दशलक्ष डॉलरने कमी झाले.
चायना रेनेसान्स होल्डिंग्स लिमिटेडने इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप NIO मध्ये गुंतवणूक करून नुकतीच जगभर चर्चा झाली आहे. यासह, कंपनी सल्लागार सेवा देखील देते.

जॅक माही गायब झाले होते
यापूर्वी, चीनी टेक कंपनी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे चिनी हुकुमशहांविरोधात वक्तव्य केल्यानंतर एक वर्षासाठी लोकांपासून गायब झाले होते. यासोबतच त्यांच्या कंपनीला आयपीओ आणण्यासही मज्जाव करण्यात आला होता. तो टोकियोमध्ये शेवटचा दिसला होता.

Disappearance of dealmaker Bao Fan casts chill across China’s tech sector via @FT
https://t.co/CanPSC4kMc

— Laurance Allen (@LarryVNN) February 20, 2023

China Big Industrialist Bao Fan Missing


Previous Post

७ आसनी मारुती अर्टिगाला या कारने टाकले मागे; भारतात तुफान विक्री

Next Post

इयत्ता बारावीची आजपासून परीक्षा; असे आहे नियोजन, एवढे आहेत विद्यार्थी

Next Post

इयत्ता बारावीची आजपासून परीक्षा; असे आहे नियोजन, एवढे आहेत विद्यार्थी

ताज्या बातम्या

साक्षी गर्गे बनली आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच; नाशिकला प्रथमच बहुमान

March 28, 2023

मनमाड जवळील लोणच्या डोंगरावर पेटला वणवा; वनविभागाने लावलेली हजारो झाडे जळून खाक

March 28, 2023

EPFOचा मोठा निर्णय; या वर्षी पेन्शनवर मिळणार इतके टक्के व्याज

March 28, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group