मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांत डुप्लिकेट आधार कार्ड मिळण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) अशा प्रकरणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत ६ लाख बनावट आधार कार्ड रद्द करण्यात आले आहेत. देशात डुप्लिकेट किंवा बनावट आधार कार्ड बनवणारे किती सक्रिय आहेत, याचा अंदाज नुकत्याच यूआयडीएआयने रद्द केलेल्या आधार कार्डांची संख्या पाहून लावला जाऊ शकतो.
आजच्या काळात आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे मानले जाते कारण आधार कार्ड हे देशाचे नागरिक असल्याचे ओळखण्यासाठी आवश्यक कागदपत्र आहे. आजच्या काळात, सरकारी योजना, नोकरी किंवा अशा इतर सेवांचा लाभ घ्यायचा असेल, जिथे ओळखपत्राची मागणी केली जाते, तरच आधारची मागणी केली जाते.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात संसदेत सांगितले की, गेल्या काही काळापासून सरकारकडे डुप्लिकेट आधार कार्डशी संबंधित अनेक तक्रारी येत होत्या. यावर कारवाई करत आधार कार्ड जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने कठोर पाऊल उचलत देशभरातील तब्बल 5 लाख 98 हजार 999 आधार कार्ड रद्द केले आहेत. जानेवारी 2022 पासून सरकारने 11 संकेतस्थळांना आधार कार्ड सेवा देण्यास बंदी घातली आहे. राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती नुकतीच दिली.
कोणत्याही नागरिकाला आधार कार्डची नोंदणी करण्याचा, कोणाचाही बायोमेट्रिक बदल करण्याचा आणि मोबाइल क्रमांक बदलण्याचा अधिकार आता सरकारकडे आहे, या संकेतस्थळांकडे नाहीत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना बोगस आधार कार्डविषयी माहिती दिली. डुप्लिकेट आधार कार्डची समस्या दूर करण्यासाठी यूआयडीएआय (UIDAI) सातत्याने पावले उचलत आहे. यासह आता आधार कार्डमध्ये ‘फेस’ व्हेरिफिकेशनचे फीचर अॅड करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. म्हणजेच आता आधार कार्ड पडताळणीत चेहऱ्याचाही वापर केला जाणार आहे.
आतापर्यंत पडताळणीसाठी फक्त बोटांचे ठसे आणि डोळ्यांचा वापर केला जात होता. पण या नव्या फिचरमुळे बोगस आधार कार्ड हुडकून काढण्यासाठी आणि ते रोखण्यासाठी मदत होणार असल्याचे आधार कार्ड लिंक्ड सेवांचा दावा करणाऱ्या बनावट वेबसाइटला प्राधिकरणाने नोटीस बजावली असून अशा बोगस संकेतस्थळावर लवकरच कारवाई अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच त्यांना आधार कार्डसंबंधित सेवा पुरवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. एवढेच नाही तर सरकारच्या तीव्र आक्षेपानंतर या वेबसाइट्सच्या होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हायडरना त्या तातडीने ब्लॉक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जानेवारी 2022 पासून सरकारने 11 वेबसाईटना आधार कार्ड सेवा देण्यास बंदी घातली आहे. कोणत्याही नागरिकाला आधार कार्डची नोंदणी करण्याचा, कोणाचाही बायोमेट्रिक बदल करण्याचा आणि मोबाइल क्रमांक बदलण्याचा अधिकार या वेबसाइटना नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
भारतीय नागरिकांना त्यांच्या आधार कार्डमध्ये आपला पत्ता, मोबाईल नंबर किंवा फोटो बदलायचा असेल तर त्यांना आधार कार्ड सेंटर किंवा प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर जावे लागणार आहे. एवढेच नाही तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत असल्याचा संशय असल्यास त्यांनीही सेवा केंद्राशी संपर्क साधून त्याची माहिती घ्यावी अथवा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाशी संपर्क साधावा.
डिजिटायझेशनच्या या जमान्यात डुप्लिकेट सर्टिफिकेटचा धंदा करून आपले खिसे भरत होते. वाढती प्रकरणे पाहता केंद्र आणि राज्य स्तरावर बनावट आधार कार्ड बनवणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईचा एक भाग म्हणून UIDAI ने आधार कार्डशी संबंधित सेवांचा दावा करणाऱ्या सुमारे डझनभर बनावट वेबसाइट्सना नोटिसाही पाठवल्या आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारची सेवा देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
6 Lakh Aadhar Card Cancel by UIDAI How to Check