पुणे – फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा अन्नधान्य पुरवठा-साखळी व्यवस्थापनाशी निगडित सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा उपक्रम आहे. या क्षेत्रातील पंजाब डेपो आणि कार्यालयांमध्ये चौकीदार पदासाठी 860 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे पाचवी ते आठवी शिक्षण झालेल्यांना उत्तम संधी आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे. सध्याच्या काळात वय 18 ते 25 वर्षांपर्यंतच्या तरुणांना सरकारी नोकरी मिळवायची संधी आहे. परंतु त्यांनी पाचवी तसेच आठवीपर्यंत शिक्षण घेतले असावे .या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर या भरती प्रक्रियेशी संबंधित इतर महत्त्वाच्या माहितीसाठी FCI पंजाबच्या अधिकृत वेबसाइटवर चौकीदार तथा वॉचमन पदासाठी 860 रिक्त पदांची भरती प्रसिद्ध केली आहे.
एफसीआय चौकीदार भरती 2021 साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना पंजाबमधील कार्यालये आणि आगारांमध्ये नोकरी दिली जाईल. ऑनलाईन अर्ज 11 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत, तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे. FCI भरतीच्या लेखी परीक्षेची तारीख लवकरच अधिसूचित केली जाईल.
एफसीआय पंजाब वॉचमन भरती 2021 साठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी संबंधित पदासाठी पात्रता निकष पूर्ण करावेत. सर्व महत्त्वपूर्ण तपशील भरती अधिसूचनेमध्ये निर्दिष्ट केले आहेत जे वर दिलेल्या पीडीएफ लिंकवरून डाउनलोड केले जाऊ शकतात. शैक्षणिक पात्रतेत चौकीदार पदासाठी अर्जदार किमान 8 वी पास असावेत. तर अर्जदार माजी कंत्राटी सुरक्षा रक्षक असेल तर त्यांचे शिक्षण पाचवी उत्तीर्ण असेल तरीही ते पात्र असतील.