चांदवड- माता पार्वतीने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी ६४ वर्षे झाडाची पाने व कंदमुळे खाऊन तपश्चर्या केली. पार्वतीने हरतालिकेचे व्रत केल्याने सौभाग्य अखंड राहते असा आशीर्वाद भगवान शंकराने दिला. या प्रथेप्रमाणे यंदाही चांदवडला हरतालिकेचा सण साजरा करण्यात आला. चांदवड मध्ये कोरोनाचे सावट असल्याकारणामुळे व सर्व मंदिरे बंद असल्यामुळे शहरातील महिलांनी हरतालिकेची पूजा घरीच केली. कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे म्हणून प्रार्थना केली. यावेळी समाजसेविका जयश्री कोकणे, शोभा कोकणे, मीना कोकणे, सविता सोनवणे, अर्चना कोकणे, वृषाली कोकणे, वंदना कोकणे आदींनी यथोचित हरतालिका पूजा केली.