मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवा उद्योग सुरू करणे आणि तो प्रचंड मेहनतीने वाढविणे येरागबाळ्याचं काम नाही. पण कमालीचं यश मिळविणारी एखादी अशी कंपनी चार भुरटे येऊन गिळून टाकतात तेव्हा किती वेदना होतात, याचा अंदाज लावणेही अवघड आहे. दोन तरुणांनी आपली अशीच एक कहाणी ‘शार्ट टँक’मध्ये सांगितली आणि चक्क जजेसलाही रडू कोसळलं.
सोनी वाहिनीवरील शार्क टँक इंडियाचा नवा सिझन चांगलाच गाजतोय. नाविन्यपूर्ण उद्योग किंवा उद्योग यशस्वी करण्याचे नाविन्यपूर्ण प्रयोग ऐकून तुमी थक्क व्हाल, अशी मंडळी यात सहभागी होत आहे. अश्यात दोन तरुण आपली दर्दभरी कहाणी घेऊन पोहोचले आणि सारं वातावरणच बदलून गेलं. दोन तरुण उद्योजक याठिकाणी आले आणि त्यांनी सांगितले की आम्ही सुरू केलेल्या कंपनीचा वर्षाचा टर्नओव्हर चाळीस कोटी रुपये होता. पण काही लोकांसोबत आम्ही एक मिटींग केली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमची कंपनी गायब झालेली होती. या उद्योजकांनी सांगितलेल्या कहाणीचा व्हिडियो संपूर्ण जगात चांगलाच व्हायरल होत आहे. एखाद्या उद्योजक समूहाला आलेला हा अनुभव अनेक नवउद्योजकांना धडा देणारा ठरत आहे.
असे काय झाले रातोरात?
या उद्योजक समूहाने सांगितले की, आजपासून आठ वर्षांपूर्वी आम्ही एक कॉन्टेंट कंपनी सुरू केली. आमच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर ४० कोटी रुपये होता. एक दिवस एक उद्योजक गट आम्हाला भेटला आणि आपण गुंतवणुक करायला तयार असल्याचे सांगितले. आम्ही त्यानुसार मिटींग केली. ज्या रात्री मिटींग झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कंगाल झालेली होती.
शार्क टँक काय करणार?
या उद्योजकांनी आता शार्क टँककडून गुंतवणुकीची अपेक्षा केली आहे. कंपनी पुन्हा एकदा मुळ पदावर आणण्यासाठी शार्क टँक मदत करेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. शार्क टँक किती गुंतवणुक करेल आणि किती इक्विटी शेअर करेल, याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे.
40 Crore Company Lapse in One Night
Shark Tank India Promo Episode