अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहरातील प्रयास हॉस्पिटल जवळ असलेल्या शरद नामदेव दुसाने यांच्या ज्वेलर्स यांचे दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडत दुकानातील चांदी, सोन, रोख रक्कम असा २१ लाखाचा ऐवज लूटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सकाळी ही गोष्ट लक्षात आल्यानंतर दुकानाचे मालक शरद दुसाने यांनी या बाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी डॉग स्कॉड, फिंगर प्रिंटस घेत तपास सुरु केला. दरम्यान चोरटे एका चार चाकी गाडीतून आल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्यावरुन पोलिस अधिक तपास करीत आहे.