India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘अशी सत्ता पसंत नाही’; महाराष्ट्रातील राजकीय नाट्यात अटल बिहारींचे भाषण व्हायरल

India Darpan by India Darpan
June 25, 2022
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  सध्या महाराष्ट्रात राजकीय नाट्य जोरात सुरू आहे. प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे. शिवसेनेशी संबंध तोडल्यानंतर आसाममध्ये पक्षाच्या आमदारांमध्ये सामील झालेले एकनाथ शिंदे आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करीत आहेत. त्याचवेळी शिवसेनेकडून भावनिक कार्ड खेळले जात आहे. दरम्यान, भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे एक भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भाषणात अटलजींनी सांगितलेल्या गोष्टी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय संकटाशी जोडल्या जात आहेत.

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे हे भाषण १९९६ सालचे आहे. त्यानंतर अवघ्या १३ दिवसांनी त्यांचे सरकार पडले होते. राष्ट्रपतींना राजीनामा देण्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनी संसद भवनात भाषण केले. तेव्हा त्यांनी हेराफेरी आणि युतीच्या सरकारबद्दल बरेच काही सांगितले होते. पक्ष फोडून सत्तेसाठी युती करावी लागणार असेल, तर मला चिमट्यानेही अशा सत्तेला हात लावायला आवडणार नाही, असे ते म्हणाले होते.

शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्रात पक्ष फोडण्याच्या बेतात आहेत. उद्धव सरकारला अडचणीत आणण्यासोबतच त्यांनी शिवसेना पक्षावरही दावा ठोकला आहे. यासोबतच अपक्ष आमदार जोडून पुरेसे संख्याबळ उभी करण्याचा दावाही ते करत आहेत. अशा परिस्थितीत लोक अटलजींच्या जुन्या भाषणाचा संबंध या परिस्थितीशी जोडत आहेत. त्याचबरोबर अटलजींचे हे भाषण जुने असेल, असा दावाही काही लोक करत आहेत, पण सध्याच्या परिस्थितीत ही एकप्रकारे शिवसेनेला टोमणे मारणारी आहे.

maharashtra political crisis atal bihari vajpeyee speech viral


Previous Post

निलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदी ३ वर्षे पूर्ण; त्यांच्या कारकिर्दीचा हा आढावा…

Next Post

मालेगावमध्ये दुसाने ज्वेलर्सचे दुकान फोडून २१ लाखाची चोरी ( बघा व्हिडीओ )

Next Post

मालेगावमध्ये दुसाने ज्वेलर्सचे दुकान फोडून २१ लाखाची चोरी ( बघा व्हिडीओ )

ताज्या बातम्या

खाते वाटपातून काय स्पष्ट होते? फडणवीसांचे वजन वाढले की घटले?

August 15, 2022

मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न नेमका काय आहे? नाशिक जिल्ह्याचे विभाजन होणार का?

August 15, 2022

सुधीर मुनगंटीवारांचे मोठे फर्मान; फोन उचलताच अधिकाऱ्यांनी हे म्हणायचे

August 15, 2022
प्रातिनिधिक फोटो

संतापजनक! चिमुकल्याला महिलेने दिले गरम चिमट्याचे चटके

August 15, 2022
प्रातिनिधीक फोटो

टीआरपी शर्यतीत ही मराठी मालिका ठरली नंबर १; बघा, तुमची मालिका कुठल्या क्रमांकावर

August 15, 2022

अविवाहित महिलांच्या लाभासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

August 15, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group