आजचे राशीभविष्य – गुरुवार – १७ डिसेंबर २०२०
मेष- खर्चाचा अंदाज चुकेल
वृषभ- मध्यस्ती टाळावी
मिथुन- स्वतः शी संवाद साधा
कर्क- गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी
सिंह- आश्वासन पाळा
कन्या- शाब्दिक कटुता टाळा
तूळ- कार्यक्षेत्रात बदल संभवतो
वृश्चिक- अचानक मोठी जबाबदारी
धनु- नेत्रविकार सांभाळा
मकर- वेळापत्रक सांभाळतांना त्रेधातिरपीट
कुंभ- करारनामे संभाळा
मीन- गुंतवणुकीच्या संधी.
……….
शंकासमाधान
प्रश्न- राहुल – पन्ना रत्न कुणी वापरावे?
उत्तर- पना रत्नाचा संबंध बुध ग्रहाशी आहे. कुंडली मधील बुध हा राहुच्या युतीमध्ये असेल अथवा केतूच्या युतीमध्ये असेल त्याचबरोबर बुधाच्या सप्तमेश राहू अथवा केतू असतील.. कुंडलीत षष्ठम अष्टम अथवा द्वादश गाणी बुध असेल.. किंवा एकूणच बुध ग्रहावर ग्रहांची दृष्टी असेल तर पन्ना रत्न वापरले जाते. केवळ आपली रास मिथुन आहे किंवा कन्या आहे म्हणून पन्ना रत्न वापरू नये.. कुंडली बनवणे शक्य नसेल तर हस्तरेषा वरून देखील पन्ना रत्न सुचवले जाते. पन्ना रत्न उजव्या हाताच्या करंगळीत मध्ये चांदी अथवा सोन्यामध्ये वापरले जाते. त्यामुळे करंगळीच्या खालील MERCURY MOUNTAIN वर जर जाळीदार चिन्ह असेल BLACK रंगातील तीळ असेल अथवा × चिन्ह असेल त्याचप्रमाणे करंगळीच्या वरच्या फेरावरील शंखाकृती रेषा या अनामि का बोटा कडे झुकलेल्या असतील आणि दुसर्या व तिसर्या पेरावर बऱ्यापैकी जाळीदार भाग असतील अशावेळी पन्ना रत्न सुचवले जाते. थोड्याशा LUSH GREEN रंगातले हे रत्न अतिशय सुंदर दिसते. जांबिया पन्ना कोलंबिया पन्ना चेतक पन्ना पोटा पन्ना ओनेक्स पन्ना अशा प्रकारची पन्ना रत्नांमध्ये वरायटी असते. कोणतेही रत्न तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी करावे व वापरावे.
..
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.