रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

१४ जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून का साजरा केला जातो?

by Gautam Sancheti
जून 13, 2022 | 10:09 pm
in इतर
0
blood 1

ऐक्यासाठी रक्तदान…

रक्तदान अनमोल आहे. आपले रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकते. रक्ताची गरज कोणाला कधीही आणि कुठेही लागू शकते. त्यामुळे “करुन दान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे” हे व्रत सर्वांनीच अंगिकारणे गरजेचे आहे. Donating blood is an act of solidarity. Join the effort and save live, असे जागतिक आरोग्य संघटनेचे यंदाच्या वर्षीचे रक्तदान दिनानिमित्तचे घोषवाक्य आहे. रक्तदानाबाबत जाणिव जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी १४ जून रोजी ‘जागतिक रक्तदाता दिन’ साजरा केला जातो.

संशोधक कार्ल लॅन्डस्टायनर यांचा १४ जून हा जन्म दिवस. त्यांनी ABO रक्तगटाचा शोध लावला. ‘जागतिक रक्तदाता दिन’ प्रथम सन २००४ मध्ये साजरा करण्यात आला आणि त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने दरवर्षी हा दिन जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. रक्तदान करुन रुग्णांसाठी life saving gift दिलेले आहे अशा दात्यांचे व रक्तदान शिबीर संयोजक यांनी रक्तदान शिबीरे आयोजित केल्याबाबत त्यांचे आभार मानणे व युवा वर्गामध्ये नियमितपणे स्वैच्छिक रक्तदान करण्यासाठी जनजागृती निर्माण करणे आहे.

राज्यात स्वैच्छिक रक्तदानाची टक्केवारी ९९.०७% आहे. महाराष्ट्र राज्य देशामध्ये रक्तसंकलनाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. राज्यामध्ये ३६१ रक्तकेंद्र आणि ३६१ रक्त साठवणूक केंद्रे आहेत. कोविड -१९ महामारीचा काळ असतानादेखील महाराष्ट्राने अनुक्रमे १५.२८ व १६.७३ लाख युनिट रक्त संकलन केले. देशातील अव्वल क्रमांक कायम ठेवला.

रक्तदानाचे महत्त्व
जग प्रगत झालेले असतानाही रक्ताला कुठलाही पर्याय शोधता आलेला नाही. माणसाला फक्त माणसाचेच रक्त लागते. जगामध्ये दर दोन ते तीन सेकंदाला कुणाला ना कुणालातरी रक्ताची गरज भासते. आजकाल धावपळीच्या काळात दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढते आहे. अपघात, छोट्यामोठ्या शस्त्रक्रिया, प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव, विविध आजार, तसेच थॅलेसिमिया सारखे रक्ताशी निगडीत इतर आजार, मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती, या कारणांमुळे रक्त व रक्तघटकाची मागणी वाढते आहे.

रक्तदानास “द्रवरूपी अवयवदान” (fluid transplant) म्हणून संबोधले जाते, कारण रक्त व रक्तघटक दिल्यामुळे लाखो रुग्णांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे रक्ताला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.
नियमित रक्तदाते व रक्तदान शिबिर संयोजक यांच्या सहकार्यामुळे, महाराष्ट्रात स्वैच्छिक रक्तदानाची चळवळ चांगल्या प्रकारे रुजली आहे. त्यामुळे, महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये रक्त संकलनामध्ये आघाडीवर आहे. कोरोना सारख्या आजाराच्या संक्रमण काळातही रक्त संकलन १६.७३ लाख युनिट होते.

रक्त संक्रमण सेवा मजबूत
महाराष्ट्रामध्ये रक्त संक्रमण सेवेसाठी सद्यस्थितीत ३६१ रक्तकेंद्रे कार्यरत आहेत. त्यापैकी ७६ रक्तकेंद्रे शासकीय क्षेत्रातील आहेत तर उर्वरित २८५ रक्तकेंद्र धर्मादाय संस्था, खाजगी संस्था व इंडियन रेड क्रॉस संचलित आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये ग्रामीण पातळीवर ३६१ रक्त साठवणूक केंद्र आहेत. एवढ्या मोठया प्रमाणात रक्त सेवेच्या पायाभूत सुविधा व जाळे असणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त सेवेच्या पायाभूत सुविधा व जाळे असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. रक्ताची आयुर्मर्यादा (shelflife) फक्त ३५ दिवस असल्याने एकाचवेळी जास्तीचे रक्त संकलन करता येत नाही. यामुळे रक्तदात्यांनी विशेषतः युवा वर्गाने नियमित म्हणजे दर तीन महिन्याला रक्तदान करावे.

रक्तदान करणे सहज सोपे
रक्तदान करणे सुलभ प्रक्रिया आहे. त्यासाठी केवळ १० मिनिटे लागतात. आपल्या शरीरामध्ये ४ ते ५ लिटर रक्ताचा साठा असतो. ३५० मिली म्हणजे शरीरातील एकूण रक्ताच्या ५% रक्तदान केल्याने आपल्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे वर्षातून ४ वेळा तरी १८ ते ६५ वयोगटातील निरोगी व्यक्तींनी रक्तदान करावे. एका रक्तदानातून तुम्ही ४ व्यक्तींना जीवनदान देऊ शकता. १८ ते ६० वयोगटातील आणि ४५ किलोपेक्षा जास्त वजन असणारी कोणतीही व्यक्ती रक्तदान करु शकते. मात्र वैद्यकीय तपासणी करुन दाता रक्त देण्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवले जाते. तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करावे.

स्वतःचे रक्त वापरणे
कोणताही व्यक्ती आपले स्वतःचे रक्त स्वतःसाठी वापरु शकतो. पूर्वनियोजित शस्त्रक्रिया असणारी व्यक्ती अगोदर रक्तदान करुन शस्त्रक्रियेदरम्यान रक्त वापरु शकतो. यामुळे ऐनवेळी धावपळ करावी लागत नाही. संक्रमणाची शक्यता नसते. स्वतःचे रक्त अत्यंत सुरक्षित असते, रक्तदान कोणत्याही शासनमान्य पेढीतच करावे.

– रवींद्र राऊत (लेखक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय येथे वरिष्ठ सहायक संचालक म्हणून कार्यरत आहेत)
(संदर्भ : राज्य रक्त संक्रमण परिषद, जागतिक आरोग्य संघटना)

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पेटीएम या उद्योगाची अशी झाली स्थापना; असा आहे कंपनीचा खडतर यशोप्रवास

Next Post

मालेगाव शहरात वादळी पाऊस ( बघा व्हिडीओ )

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
Next Post
20220613 221831

मालेगाव शहरात वादळी पाऊस ( बघा व्हिडीओ )

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011