रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इयत्ता अकरावीची जादा तुकड्या, अतिरिक्त शाखा मंजुरी प्रक्रिया आता ऑनलाईन होणार

by India Darpan
मे 8, 2025 | 8:55 am
in संमिश्र वार्ता
0
5 2 1024x768 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– इयत्ता ११ वी च्या जादा तुकड्या/ अतिरिक्त शाखा मंजूर करण्याबाबत दरवर्षी साधारणतः २५० ते ३०० प्रस्ताव प्राप्त होतात. या प्रस्तावांचा प्रवास शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक व शासनस्तर असा होतो. प्रस्तावामध्ये त्रूटी आढळल्यास पुन्हा याच प्रकारे प्रस्ताव सादर करावा लागतो. यामध्ये वेळ, पैसा यांचा अपव्यय होतो. या बाबींचा विचार करता सर्व संस्थांनी संगणकीय प्रणालीचा वापर करुन इयत्ता ११ वी च्या जादा तुकड्या/ अतिरिक्त शाखांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

इयत्ता ११ वी च्या जादा तुकड्या/ अतिरिक्त शाखा मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, शिक्षण संचालक तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे व विद्यालयांचे ५०० हून अधिक प्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी केले.

एन.आय.सी.पुणे यांच्याद्वारे संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून या प्रणालीमुळे संस्थेला कोणत्याही कार्यालयात न जाता इयत्ता ११ वी ची तुकडी व शाखा वाढीसाठी अर्ज करता येणार आहे. संस्थेला संबंधित कागदपत्रे थेट प्रणालीवर अपलोड करता येतील व संबंधित अधिकारी ती ऑनलाईन तपासू शकतील. अर्जामधील माहिती व अपलोड कागदपत्रे स्वयंचलित प्रणालीद्वारे पूर्वनिश्चित निकषांनुसार तपासली जातील, ज्यामुळे मानवी चुका कमी होऊन वेळ वाचेल. संगणकीय प्रणालीतून मिळणाऱ्या आकडेवारीवर आधारित निर्णय घेणे शक्य होईल जे अधिक पारदर्शक व वस्तुनिष्ठ ठरेल. अर्ज मंजुरीसाठी लागणारा वेळ देखील कमी होणार आहे.

अर्ज वेळेत व परिपूर्ण सादर केल्यास शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर इयत्ता ११ वी ची तुकडी व शाखा वाढीसाठी अर्ज मंजूर करता येईल. इयत्ता ११ वी ची तुकडी व शाखा वाढीसाठी लागणारी मंजूर तुकडी व आधार वैध मुलांची संख्या स्टुडेंट पोर्टलवरून संगणकीय प्रणालीद्वारे उपलब्ध होईल, त्यामुळे सदर माहिती भरण्याची गरज राहणार नाही. या अर्जाचे ट्रॅकिंग ऑनलाईन प्रणालीद्वारे संस्थेस अवगत होणार असून अर्ज कोणत्या स्तरावर मंजूर झाला, पुढे कोणत्या वरिष्ठ स्तरावर मंजुरीसाठी गेला अथवा नामंजूर झाला असल्यास त्याची कारणे ऑनलाईन पद्धतीने अवगत होणार आहेत. संस्थेसाठी एक सुलभ, आकर्षक आणि उपयुक्त डॅशबोर्ड उपलब्ध होईल ज्यावरून सर्व अर्ज ट्रॅकिंग, दस्तऐवज व इतर माहिती एकत्र पाहता येईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अवकाळीचे वातावरण, गारपीटीचा धोका व दुपारच्या उन्हाची ताप व रात्रीच्या उकाड्यात कमालीची घट…

Next Post

सीटीलिंक बससेवा पुन्हा चर्चेत…कंत्राटदाराकडून पैसे घेवून नोकरी दिल्याचा आरोप

Next Post
Nashik city bus 6 e1723473271994

सीटीलिंक बससेवा पुन्हा चर्चेत…कंत्राटदाराकडून पैसे घेवून नोकरी दिल्याचा आरोप

ताज्या बातम्या

nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011