मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा उसळी घेतली आहे. त्यामुळेच एकाच दिवसात कोरोना बाधितांची संख्या दुप्पट होत असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीचे गांभिर्य सर्वांनी ओळखणे आवश्यक आहे. राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायत माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्य सरकारने कोरोना निर्बंधांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे सर्व नियमांचे कसोशीने पालन सर्वांनी करायला हवे. मास्क न घालणाऱ्यांनाही पवार यांनी खडे बोल सुनावले आहेत.
बाधित झालेल्या मंत्र्यांमध्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालविकास मंत्री अॅड यशोमती ठाकूर, आदिवासी विकास मंत्री अॅड के सी पाडवी, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा समावेश आहे. तर, कोरोनाची लागण झालेल्या नेत्यांमध्ये खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे कुटुंबिय, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार सागर मेघे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार शेखर निकम, आमदार माधुरी मिसाळ आदींचा समावेश आहे.
https://twitter.com/ANI/status/1477143859297542144?s=20