पिंपळगावं बसवंत – चारचाकी वाहनांसाठी पेट्रोल व डिझेलला सक्षम पर्याय म्हणून सीएनजी गॅस उपलब्ध आहे. सीएनजी गॅसची दर्जा व गुणवत्तापूर्ण सेवा दिल्यास ग्राहकांचा कल वाढेल. प्रदूषणही कमी होईल, असा आशावाद नाशिकचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी व्यक्त केला.
देशमाने पेट्रोलिअयम येथे एचपीसीएल कंपनीच्या सीएनजी गॅस आऊटलेटचा शुभारंभ पोलीस अधिक्षक पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २२) करण्यात आला. त्यामुळे पाटील बोलत होते. यावेळी एचपीसीएल कंपनीचे विभागीय व्यवस्थापक प्रलय जांभूळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले की, सीएनजी गॅसमधून नागरिकांच्या पैशांची बचत होऊन प्रदूषणही कमी होणार आहे.
यावेळी नवल किशोर, मुकुंद पाटील, अनुरागन शेट्टी, पराग दाणी, सचिन सुतार, रोहीत आहेर, मनोज कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. देशमाने पेट्रोलिअमचे अविनाश देशमाने, सतीश देशमाने, विनोद देशमाने यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
ग्राहकांना चांगली सुविधा देण्यास आम्ही कटीबद्ध
पेट्रोल, डिझेलला सीएनजी पंपामुळे एक नवा पर्याय निर्माण झाला आहे. ग्राहकांना चांगली सुविधा देण्यास आम्ही कटीबद्ध राहू.
– सतीश देशमाने, संचालक, सीएनजी पंप*