नाशिक – ब्रेक द चेन अंतर्गत नाशिक शहरासह जिल्ह्यात उद्या आणि परवा (१० आणि ११ एप्रिल) पूर्णतः लॉकडाऊन असणार आहे. प्रशासनाने त्याची संपूर्ण तयारी केली आहे. कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आगामी दोन्ही दिवस केवळ अत्यावश्यक सेवा (वैद्यकीय) सुरू राहणार आहेत. अन्य सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसे आदेश यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.
दरम्यान उद्या आणि परवा नाशिक शहरात मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. त्यामुळे नाशिककरांनी केवळ अत्यावश्यक प्रसंगातच घराबाहेर पडावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिक शहर पोलिसांनी दिला आहे.