रविवार, ऑगस्ट 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लासलगावातील मुलभूत नागरी समस्येबद्दल शहर विकास समिती  तर्फे निवेदन

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 16, 2020 | 7:50 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201016 WA0012 1

लासलगांव – शहरातील मुलभूत नागरी समस्यांबद्दल नुकतेच लासलगाव शहर विकास समिती तर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे तसेच गटविकास अधिकारी संदीप कराड, पंचायत समिती उपसभापती संजय शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांना निवेदन देण्यात आले.
लासलगांव शहरात गेल्या काही वर्षांपासून नागरिकांच्या मुलभूत नागरी समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यासाठी तरुणांनी लासलगांव शहर विकास समिती स्थापन केली. त्याअंतर्गत नुकतेच अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या  समितीत सर्व राजकीय पक्षाच्या तरुणांचा सहभाग आहे. लासलगांव शहराचा विकास करणे हा एकमेव उद्देश आहे.
या समितीने अधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दैनंदिन व्यवहार तसेच दुकाने रविवारी बंद असल्याने अनेकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अनेक व्यापाऱ्यांमध्ये सदरचा बंद हा शासकीय असल्याचा संभ्रम असल्याने दंडाच्या अथवा कारवाईच्या भीतीपोटी दुकाने उघडण्यास घाबरत आहे. मात्र सदरचा बंद हा स्वयंस्फूर्तीने केलेला होता. यापुढे रविवारी देखील सर्व दुकाने खुली राहून सर्व व्यवहार सुरळीत होणे आवश्यक आहे. शासकीय आदेशानुसार दुकाने उघडी ठेवण्याची वेळ ही सायंकाळी सात वाजेपर्यंत असतानादेखील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भोंगा हा पाच वाजता लावला जातो. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. भीतीपोटी अनेक व्यापारी आपाआपली दुकाने पाच वाजता बंद करून घेतात सदरचा भोंगा हा त्वरित बंद करण्यात यावा.  शासनाने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये तो वाजला जावा,
लासलगाव परिसरात स्टेशन रोडवरील खैरे कॉम्प्लेक्स, गुरुद्वारा या परिसरात विंचुर प्रकाशा महामार्गावर रस्त्याच्या कडेला भाजीपाल्याची सध्या विक्री होत आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अनेक अडथळे निर्माण होतात त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी होते वर्दळीचा रस्ता असल्याने छोटे- मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते. अनेकदा अशा स्वरूपाचे अपघात यापूर्वी झाले आहेत. या सर्व बाबींची दखल घेऊन सदरची भाजीपाला विक्री व्यवस्थाही ग्रामपंचायत ने ठरवून दिलेल्या पूर्व नियोजित जागेवर होणे आवश्यक आहे. याशिवाय लासलगाव येथे भाजीपाला विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून ग्रामपंचायत ठेकेदारांकडून बेकायदेशीररित्या जास्तीचे पैसे पट्टीच्या रूपाने घेतले जातात. याशिवाय शेतकऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी तसेच अर्वाच्च भाषेत धमकावले जाते असे म्हटले आहे. या सर्व प्रश्नावर अधिका-यांनी सकारत्मकता दर्शवत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
IMG 20201016 WA0013
हे निवेदन देतांना सचिन आत्माराम होळकर, प्रकाश पाटील, प्रवीण कदम, बबनराव शिंदे, धर्मेश जाधव, प्रमोद, पाटील संदीप उगले, महेश मोरे, महेश बकरे, मयूर झांबरे, अमोल कुमावत, सुरेश कुमावत, सुहास कोल्हे, विकास कोल्हे, राजेंद्र कराड, महेंद्र हांडगे, विजय कचरे, अनिल आबड, सलीम सय्यद आदी उपस्थित होते. सदर निवेदनाची प्रत ही पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ भारती पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती यांना पाठवण्यात आली आहे.
लासलगांव शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्व पक्षभेद आणि राजकीय वैर  बाजूला ठेवून फक्त शहराच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. यापुढे लासलगावातील मुलभूत नागरी समस्या संबंधितांनी न सोडल्यास अत्यंत उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल येईल असा इशारा समितीच्यावतीने  सचिन आत्माराम होळकर यांनी दिला.
https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2020/10/VID-20201016-WA0015.mp4
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अक्षर कविता – देविदास सौदागर यांच्या ‘रक्ताची किंमत’ या कवितेचे अक्षरचित्र

Next Post

क्राईम डायरी – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक, गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी व तेजस्वी यादव यांची मोटरसायकल रॅली…लोकांचा मोठा प्रतिसाद

ऑगस्ट 24, 2025
प्रातिनिधीक छायाचित्र
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे यांच्या घरी उध्दव ठाकरे जाणार….सरप्राइज आले समोर

ऑगस्ट 24, 2025
GzFrSrPWAAAt v1
महत्त्वाच्या बातम्या

IADWS ची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार…संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती

ऑगस्ट 24, 2025
Untitled 41
संमिश्र वार्ता

विशेष लेख…उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक रंगणार दक्षिण विरुद्ध दक्षिण

ऑगस्ट 24, 2025
crime1
क्राईम डायरी

दुचाकी अडवून चाकूचा वार करुन दोघांनी हॉटेल व्यावसायीकाला लुटले…नाशिकमधील भररस्त्यावरील घटना

ऑगस्ट 24, 2025
ed
संमिश्र वार्ता

ईडीने विशेष न्यायालयाच्या आदेशाने जप्त केलेली ४५.२६ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता केली परत…नेमकं काय आहे प्रकरण

ऑगस्ट 24, 2025
Untitled 40
संमिश्र वार्ता

मराठी लोक भंगार है म्हणणा-या परप्रांतीयला मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप…नाशिकमधील घटना

ऑगस्ट 24, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

शिंदे यांच्या तातडीच्या निरोपानंतर नाराज तानाजी सावंत मुंबईत दाखल, दोन तास चर्चा…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 24, 2025
Next Post
crime diary 1

क्राईम डायरी - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक, गुन्हा दाखल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011