नागपूर – महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारला राहूल गांधी यांनी होकार दिला होता. ते अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितले तर आ्म्ही सत्ता सोडू, असे वक्तव्य मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. सर्व काँग्रेस पदाधिकारी व नेते हे हायकमांडसोबत आहोत. जो आदेश येईल, त्याचे आम्ही पालन करु, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार बद्दल पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.