नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील स्पिनर युजवेन्द्र चहल नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला. चहल आणि धनश्री यांचा विवाह मानेसर येथील कर्मा हॉटेलमध्ये झाला. निकटवर्तीय आणि काही नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्न झाले. चहलने आपल्या लग्नाची माहिती सोशल मीडियावर देताना काही फोटो देखील शेअर केले. आयपीएलपूर्वी या दोघांचा साखरपुडा झाला होता.
युजवेंद्रची पत्नी धनश्री कोरिओग्राफर आहे, तसेच एक प्रसिद्ध युट्यूब कलाकार आहे. आयपीएल २०२० सुरू असताना दुबईला देखील गेली होती. चहलच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर येताच अनेक क्रिकेटर्ससोबतच बीसीसीआय आणि आरसीबी आयपीएल टीमने देखील त्याला शुभेच्छा दिल्या. चहलच्या वडिलांनी या लग्नाबाबत सांगितले की, कोरोनामुळे आम्ही फार कमी पाहुण्यांना आमंत्रण दिले होते. टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये असल्याने त्यांना देखील बोलावणे करता आले नाही.