बँकॉक – म्यानमारमध्ये सत्तारूढ नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीच्या नेत्या आंग सान स्यू की आणि अन्य वरिष्ठ नेत्यांना सोमवारी छापे टाकून अटक करण्यात आल्याचं पक्षाचे प्रवक्ते न्यंट यांनी सांगितले आहे. त्यांना अटक झाल्याने म्यानमारमध्ये सत्तापालट होण्याच्या शक्यतेवरून खळबळ उडाली आहे. शेजारी देशांसह अनेकांनी म्यानमारमधील घडामोडींकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून म्यानमारमध्ये नागरिक आणि लष्करामध्ये तणाव निर्माण झाला आहे. आंग सान सू की, राष्ट्रपती विन म्यिंट आणि इतर काही नेत्यांना सोमवारी ताब्यात घेण्यात आलं. नागरिकांनी घाईगडबडीत कोणतंही प्रत्युत्तर देऊ नये. त्यांनी कायदेशीर कारावाई करावी, असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं. याबाबत लष्कराकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
म्यानमारचे लष्कर भक्कम
म्यानमारचे लष्कर राजकीय परिस्थिती हाताळण्यासाठी भक्कम आहे. मात्र सत्ता काबीज करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना नागरिकांकडून पाठिंबा मिळणं आता खूप कठिण आहे, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. लष्करानं असा प्रयत्न केला तर याच्याविरोधात नागरिकांकडून रोष व्यक्त केला जाईल, असं यंगून इथल्या तंपादिपा इन्स्टिट्यूटचे राजकीय विश्लेषक खिन जाव विन यांनी एका अल जजिरा या वृत्तवाहिनीला सांगितलं.
नागरिकांमध्ये लष्कराच्या सत्तेच्या आठवणी ताज्या आहेत. या विचारांनाच आता ते विरोध करत आहेत. सत्ता उलथवण्याचा लष्कराचा प्रयत्न त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे, असं खिन यांनी सांगितलं.
नागरिकांमध्ये लष्कराच्या सत्तेच्या आठवणी ताज्या आहेत. या विचारांनाच आता ते विरोध करत आहेत. सत्ता उलथवण्याचा लष्कराचा प्रयत्न त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे, असं खिन यांनी सांगितलं.