अंतराळात वस्ती करण्याच्या दृष्टीने मानवाचे पुढचे पाऊल!!
मानव शेवटी अंतराळात स्थायिक होईलच. स्पॅसेक्स कंपनीचे अलस्क यांनी अलीकडेच मत व्यक्त केले की आत्तापासून अवघ्या पाच वर्षानंतर स्पॅसेक्स 2026 मध्ये मंगळावर मनुष्याचे पदार्पण करेल. आणि हे फक्त मंगळावरचे दगडगोटे गोळा करण्यासाठी नसेल तर मंगळावरच्या भविष्यातील मानवाच्या नव्या भविष्याची नांदी ठरेल.
या विषयातील अत्याधुनिक संशोधनाबद्दल ची माहिती देण्यासाठी यासाठी खास भारतातील विज्ञानप्रेमी प्रेक्षकांसाठी *रविवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा* वाजता “स्पेस सेटलमेंट 2021” विषश कार्यक्रम झूम वेबिनार द्वारे ब्रॉडकास्ट केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे शेड्युल व अधिक माहिती इथे उपलब्ध आहे. spacesettlement2021.nss.org
हा कार्यक्रम e360tv.com, the NSS Facebook page, the NSS YouTube channel and space.com या सर्व चॅनेल्स वर पाहता येईल.
या विषयातील तज्ञ मानवाच्या अंतराळातील नवीनतम प्रयोगांविषयी: आपण कुठे जाऊ, आपण तिथे का जायचे आहे आणि आपण हे कसे करू शकतो या विषयावर सखोल चर्चा करतील. तसेच फेसबुक व यूट्यूब च्या चॅट विंडो मध्ये जाऊन वक्त्यांशी संवाद साधता येईल.
या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन नॅशनल स्पेस सोसायटीचे डायरेक्टर व नाशिक चाप्टर चे अध्यक्ष श्री अविनाश शिरोडे यांनी केले आहे.