अवनीची बर्न्ट शुगर..!
अवनी दोशी या मूळ भारतीय वंशाच्या लेखिकेचे बुकर नामांकन झाले आहे. साहित्य जगतासाठी निश्चितच महत्वाची बाब आहे. कोण आहेत त्या? त्यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा फोकस…
– डॉ. स्वप्नील तोरणे
(लेखक संवादशास्त्र अभ्यासक आहेत)
“I would be lying if I said my mother’s misery has never given me pleasure.” या वाक्यानेच ‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीची सुरुवात होते, आणि पुढे काय असेल याची चुणूक मिळते. ही कादंबरी इंग्लंड मध्ये प्रसिध्द झाली आणि त्याच आठवड्यात साहित्य विश्वात जागतिक स्तरावर अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या बुकर पुरस्कारासाठी या पुस्तकाला नामांकन मिळाले.
अवनी दोशी या भारतीय वंशाच्या परंतु अमेरिकेतील न्यू जर्सी येथे जन्म झालेल्या ३८ वर्षीय लेखिकेचे लौकीक अर्थाने पहिलेच पुस्तक. ‘गर्ल इन व्हाइट कौटन’ या नावाने हेच पुस्तक भारतात या पूर्वी प्रसिध्द झाले होते.
अवनीने बर्नार्ड कॉलेज व आर्ट हिस्ट्री या विषयात पदवी घेतली आणि पदव्युत्तर शिक्षण हिस्ट्री ऑफ आर्ट या विषयात युनिव्हर्सटी ऑफ लंडन येथून पूर्ण केले. लेखिका म्हणून काम सुरू करण्यापूर्वी तिने दक्षिण आशियातील समकालीन कला यात विशेष प्राविण्य मिळवले. त्यानंतर तिने कला समीक्षक म्हणून कामकाजास सुरुवात केली. कला समीक्षणाबद्दलचे तिचे लिखाण प्रसिध्द देखील झाले होते.
तारा आणि अंतरा या आई आणि मुलगी या दोन स्त्रियांमधील भाव विश्वाची उकल बर्न्ट शुगर या कादंबरीत आहे. पुण्यात आपल्या पतीसमवेत रहायला गेलेल्या अंतराची भेट तिच्या आईशी म्हणजे ताराशी होते. तारा आपल्या छोट्या मुलीला सोडून, संसार अर्ध्यावरच टाकून निघून जाते. तेथून ती एका आश्रमात जाऊन राहते. बेदरकार, उत्श्रृंखल आयुष्य जगताना ताराला ना संसाराची आठवण येत ना मुलीची. अनेक वर्षे जातात. अनपेक्षित वळणावर अचानक मुलीची भेट आपल्याला सोडून गेलेल्या आईशी होते. आई आता वृद्ध झाली आहे. वेगवेगळ्या आजारांसोबत स्मृतीभंश झालेल्या ताराला सांभाळण्याची कसरत अंतराला करावी लागत आहे. यातूनच उलगडत जातो नात्याचा एक एक पदर.
आपल्या आईच्या तारुण्यातील वागण्याचा अर्थ समजाऊन घेताना अंतरा अधिकच गुंतत जाते. कधी ताराच्या त्या वागण्याचे समर्थन, तर कधी लहानपणी दुर्लक्ष करणाऱ्या आई मुळे भोगावे लागलेले अनेक अनुभव.. या दोलायमान मानसिकतेत ताराला आपल्या आईचा सांभाळ करावा लागतो. आपल्या मानसिकतेवर आणि विचारांवर स्वतःच कन्फ्यूज असलेली अंतरा म्हणते. “There was a breakdown somewhere about what we were to one another, as though one of us were not holding up her part of the bargain, her side of the bridge.” Maybe, she concludes, the problem is they are both standing on the same side.”
लेखिका अवनी दोशी सध्या दुबईत आपल्या पती समवेत वास्तव्यास आहे. बुकर नामांकन मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अवनी सांगते, “या कादंबरीवर सुमारे सात वर्षे मी काम करीत होते. आई आणि मुलीचे भावविश्व चितारण्यापूर्वी मी आई देखील झाले नव्हते. आईच्या आपल्या अपत्या विषयीच्या भावना व्यक्त करताना आपण या अनुभवाला कमी पडत नाही ना असे वाटायचे. आता आई झाल्यानंतर मात्र त्याच भावना अनुभवण्यास मिळाल्या. ज्या मी कल्पनेने कादंबरीत लिहिल्या आहेत. या कादंबरीमुळे बऱ्याच लोकांना हे माझे व्यक्तिगत अनुभव कथन वाटते. मात्र प्रत्यक्षात माझे आणि माझ्या आईचे अतिशय उत्तम संबंध आहेत.”
भारतीय वंशाच्या बी.एस. नायपॉल यांना १९७१ मध्ये In a free state या कादंबरीसाठी, सलमान रश्दी यांना १९८१ मध्ये Midnight children या कादंबरीसाठी, अरुंधती रॉय यांना १९९७ मध्ये The god of small things या कादंबरीसाठी, किरण देसाई यांना २००६ मध्ये The inheritance of loss या कादंबरीसाठी; अरबिंद अडिगा यांना २००८ मध्ये The white tiger या कादंबरीसाठी बुकर पुरस्काराने सन्मानित केले आहे.
मूळ भारतीय वंशाच्या अवनी दोशी या अंतिम सहा मध्ये नामांकीत झाल्या आहेत. साठ हजार ब्रिटिश पौंड अशी या पारितोषिकाची रक्कम आहे. भारतीय रुपयात साधारणतः ५६ लाखांपेक्षा अधिक ही रक्कम होते. विश्वस्तरीय साहित्यिक होण्याचा सन्मान या पारितोषकाच्या रकमेपेक्षा अधिक मोलाचा आहे. बुकर नामांकन हे भारतीय साहित्य जगतासाठी निश्चितच महत्वाची बाब आहे.
डॉ स्वप्नील तोरणे यांनी खूप छान शब्दात या चांगल्या पुस्तकाचा परिचय करून दिला यासाठी धन्यवाद. पुस्तकाविषयी चे कुतूहल त्यांच्या य लेखामुळे शमले. धन्यवाद. असेच आणखी परिचय त्यानी लिहावे.
धन्यवाद …
Dr swapnil thanks ,due to you I could know about this novel it’s looking interesting ,swapnilji also has written in very nice way
Thanks Sanjayji..
परिचयावरून कादंबरी खुपच interesting वाटते आहे.नक्की वाचावी लागेल.धन्यवाद तोरणे सर.
Thanks Smita madam..
कादंबरी चा संपूर्ण गर्भितार्थच या लेखात उमजला आहे..वाहवा! काय सहज आणि ओघवती शैली आहे लिखाणाची.. पुढील लेख वाचायला नक्कीच आवडेल.
Thanks Dr Shubhada..
मनाचा मनाशी संवाद अशा स्वरूपाची ही कादंबरी आहे.
एक वेगळ्या पुस्तकाचा परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद सर,
नक्की वाचणार.
प्रसादजी,
मनःपुर्वक धन्यवाद..
Dr very well written the approach to look after and search such kind of people who really need to introduce in the society … thank you..
Thanks Nitinji..
अतिशय चांगले लिखाण अभ्यास पुर्व वाचून खूप छान वाटलं
अभिनंदन ????????
मनपूर्वक आभार.. राजेंद्रजी..
Vry finely translated in simple nd straight words…lik to hear more work from Mr.Swapnil????????????
Thanks vaishaleeji..
Good Swapnil
Aptly described book review.
Keep going n Good luck.
Ashok Deshpande
देशपांडे सर,
मनःपुर्वक धन्यवाद..
Great narration in a lucid manner by Dr. Swapnil! Looking forward to more literary work from you
Beautiful curated ????????
Ohhh.. Thanks.. Shriya..
Thanks Dr Suchetaji..
कादंबरी चा संपूर्ण गर्भितार्थच या लेखात उमजला आहे..वाहवा! काय सहज आणि ओघवती शैली आहे लिखाणाची.. पुढील लेख वाचायला नक्कीच आवडेल.
डॉ. स्वप्नीलने अवनी दोषींच्या बर्न्ट शुगर नावाच्या कादंबरीचा मनोवेधक परिचय करून दिला आहे।विश्वविख्यात बुकर पारितोषिकासाठी या भारतीय लेखिकेच्या या कादंबरीसाठी नामांकन झाले ही आभिमानाची गोष्ट आहे.कादंबरीतील दोघींचा मनोविष्कार फार चांगल्याप्रकारे चित्रीत झाला आहे.स्वप्नीलने कादंबरीची समीक्षा उत्तम प्रकारे केली आहे..अभिनंदन..।????।।सुहतो।।????
डॉ स्वप्निल,,,,अतिशय सुंदर लिखाण,, नवीन कादंबरीचा परिचय झाला,,, अभिनंदन
खूप खूप धन्यवाद. डॉक्टर आहेर सर..
डॉक्टर साहेब आपण अभ्यासलेले अनेक विषयावरील लेखन आम्ही कायमच वाचतो. आपल्या लिखाणातील वैविध्यता, वाचतांना प्रत्येक वेळी, प्रत्येक विषयात नाविन्यपूर्ण असते. त्याप्रमाणेच या कादंबरीची ही समीक्षा आपण अप्रतिम अशी अत्यंत सुंदर आणि सुलभ शब्दात वाचनास प्रलोभित करणारी आहे.
डॉक्टर साहेब आपण अभ्यासलेले अनेक विषयावरील लेखन आम्ही कायमच वाचतो. आपल्या लिखाणातील वैविध्यता, वाचतांना प्रत्येक वेळी प्रत्येक विषयात नाविन्यपूर्ण असते. त्याप्रमाणेच आपण लिहिलेली या कादंबरीची समीक्षा ही अत्यंत सुंदर आणि अप्रतिम अशा शब्दात वाचनास प्रलोभित करणारी आहे.????????
Nice effort
मनपूर्वक आभार.. राजेंद्रजी..
प्रसादजी,
मनःपुर्वक धन्यवाद..
Ohhh.. Thanks.. Shriya..