शेतकऱ्यांकडून साप वन विभागाच्या ताब्यात सुपूर्द
पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यातील उंबरखेड शिवारात साडे चार फूट लांबीचा व साडे तीन किलो वजनाचा मांडूळ जातीचा सर्प शेतकरी पंढरीनाथ गणपत निरगुडे यांच्या मळ्यात आढळून आल्याने त्यांनी तातडीने तो सर्प वनजीव संरक्षक यांच्या मदतीने वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
उंबरखेड शिवारातील शेतकरी पंढरीनाथ गणपत निरगुडे यांच्या मळ्यात मांडूळ जातीचा दुर्मिळ सर्प आढळून आल्याने त्यांनी तातडीने याबत पिंपळगाव पोलीस ठाण्यासह स्थानिक वन्यजीव रक्षक राजेंद्र पवार, विक्रम गीते, भैया महाले यांना याबत माहिती दिली.उंबरखेड येथील पोलीस पाटील निशांत मोरे यांच्या मदतीने तो सर्प वन विभागाचे नाना चौधरी, वाल्मिक व्हर्जन, वसंत देवरे यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.