नाशिक – नाशिक शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री छगन भुजबळ आज यांच्या उपस्थितीत कालिदास कला मंदिर येथे संपन्न झाला. या बससेवेनिमित्त हे दोन्ही नेते एकत्र आले. गेल्या काही दिवसापासून या सिटी बसची सेवेची नाशिककरांना प्रतिक्षा होती. यावेळी ५० बसेसचे लोकार्पण करण्यात आले. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सेवा दीड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सुरु झाली. या लोकार्पण सोहळयासाठी माजी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल, आयुक्त कैलास जाधव यांच्यासह महानगरपालिकेचे पदाघिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
शहर बससेवेसाठी खालील दोन ऑपरेटर
मे. ट्रॅव्हल टाईम कार रेंटल प्रा.लि. – १२९ सी.एन.जी. + ३० डिझेल मिडी बसेस
मे. सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स् प्रा.लि. – ८० सी.एन.जी. + २० डिझेल मिडी बसेस.
येथून होणार संचलन
नाशिक महानगरपालिका आणि मे. ट्रॅव्हल टाईम कार रेंटल प्रा.लि. व मे. सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स् प्रा.लि. मध्ये बससेवे बाबत करारनामा केला आहे. दोनही ऑपरेटर यांनी माहे मार्च 2020 अखेर बसेसची नोंदणी प्रादेशीक परिवहन विभागा नाशिक येथे केलेली आहे. या मध्ये दोन्ही कंपन्या २५० बसेसेची सेवा नाशिक शहारास पुरवणार आहे. कोव्हीड-19 मुळे ही बस सेवा सुरु झाली नसल्या कारणाने ही बस सेवा आज सुरु करण्यात आली आहे. मे. ट्रॅव्हल टाईम कार रेंटल प्रा.लि. यांचे बसेसचे संचलन हे तपोवन आगार, पंचवटी येथून होणार आहे. तसेच मे. सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स् प्रा.लि. यांचे बसेसचे संचलन हे सिन्नर फाटा, नाशिकरोड येथील आगारातून होणार आहे.
असे आहे बस फे-यांचे नियोजन
सार्वजनिक सेवेचा जास्तीत जास्त वापर करुन नागरीकांनी खाजगी वाहनाचा कमीत कमी वापर करुन प्रदुषणमुक्त नाशिक करणे त्यासाठी सीटीलींक मार्फत अध्यावत सी.एन.जी.बसेस
चालवण्यात येणार आहे. तपोवन बसस्थानक , निमाणी बसस्थानक , सी.बी.एस बसस्थानक, नाशिकरोड बसस्थानक, भगुर बसस्थानकांवरुन बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहेत.