नाशिकला आम्हाला जळगाव पॅटर्न राबवायचा होता, मात्र नाही राबवला – खा. संजय राऊत
नाशिक – महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरु आहे. नाशिकला आम्हाला जळगाव पॅटर्न राबवायचा होता, मात्र नाही राबवला. पुढील वर्षी वाजतगाजत लोकशाही मार्गाने नाशिक महापालिकेवर भगवा फडकवू असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. जळगावात जे झालं ती वेगळ्या प्रकारची लोकशाही जळगावात जे भाजपनं केले, त्याची परतफेड केली असेही ते म्हणाले.
नाशिक दौ-यावर आले असता आज त्यांनी शासकीय विश्रागृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामाबाबत प्रश्न उपस्थिती केले. ते म्हणाले की नाशिकमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली काय सुरु आहे ? महापालिकेवर दरोडे घातले जातायत, याची संपूर्ण माहिती माझ्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वाजे प्रकरणाच्या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, एनआयएनं घाईघाईने येण्याची गरज नव्हती. महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी . केंद्र सरकारचे हे प्रयत्न आहे. चौकशीसाठी अगदी केबीजीला ही आणले, तरी सरकारला काहीही फरक पडत नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुंबई पोलीस दल समर्थ असल्याचे सांगितले. एखाद्या घटनेमुळे मुंबई पोलीस दलाला धक्का लागेल असे वाटत नाही असेही ते म्हणाले.
नाशकात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. याबाबत आयुक्तांसोबत चर्चा केली आहे. राज्यात टेस्टिंग वाढवल्यात. राज्यात लसीकरण व्यवस्थित सुरु असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी युपीएच्या नेतृत्वाबाबत बोलतांना सांगितले की, युपीएची मजबूत मोट बांधायची असेल तर त्याचे नेतृत्व शरद पवारांनी करावे, युपीएची ताकद कमी होतेय. सोनिया गांधी यांनी युपीएचे नेतृत्व चांगल्या पध्दतीने केले. पण, आता त्यांची प्रकृती सध्या ठीक नसल्याने त्यांना फार लक्ष देता येत नाही. युपीए मजबुत झाला तर काँग्रेसही मजबूत होईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजपविरोधात अनेक प्रादेशिक पक्ष एकत्र येण्यास उत्सुक आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत बोलतांना ते म्हणाले की, आम्ही सर्व ममता बँनर्जी बरोबर आहे. येथे त्यांचा विजय निश्चित आहे.
–