नाशिक – ब्रेक द चेन अंतर्गत नाशिक शहरासह जिल्ह्यात उद्या आणि परवा (१० आणि ११ एप्रिल) पूर्णतः लॉकडाऊन असणार आहे. प्रशासनाने त्याची संपूर्ण तयारी केली आहे. कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. आगामी दोन्ही दिवस केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. अन्य सर्व सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी अशी आवश्यक सामान खरेदी करण्यासाठी अशी गर्दी पवननगरमध्ये होती.